Placeholder canvas
Wednesday, May 8, 2024
Homeमहाराष्ट्रमनसेचे विचार बदलले तरच युतीचा विचार : देवेंद्र फडणवीस

मनसेचे विचार बदलले तरच युतीचा विचार : देवेंद्र फडणवीस

मुंबई : शिवसेना, काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्यामुळे मनसे आणि भाजप हे दोन नवे भिडू एकत्र येण्याची चर्चा सुरु आहे. दोन दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची गुप्त भेट झाली  होती. मनसे आणि भाजपा एकत्र येण्याची कोणतीही चिन्हे नाहीत. त्यांच्या आणि आमच्या विचारात अतंर आहे. मनसेचे विचार बदलले तर विचार करु असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमात केले.

मनसे नेते बाळा नांदगावकर यांनीही राज ठाकरे भाजपासोबत जाऊ शकतात असे संकेत दिले होते. तर माजी अर्थमंत्री भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी राजकारणात कधीही कुणीही कायमच शत्रू नसतो असं विधान केलं होतं. देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या गुप्त बैठकीनंतर चर्चेला उधाण आलं आहे. मनसेचा २३ जानेवारी महामेळावा असल्यामुळे सगळ्यांचे लक्ष राज ठाकरे यांच्या भूमिकेकडे लागले आहे.

मनसे आणि भाजपा एकत्र येण्याचं कोणतीही चिन्ह नाही. त्यांच्या आणि आमच्या विचारात अतंर आहे. आणि जोपर्यंत विचार आणि कार्यपद्धतीत अंतर आहे तोपर्यंत आम्ही एकत्र येऊ शकत नाही. त्यांचे विचार आणि कार्यपद्धती बदलली तर भविष्यात विचार करु शकतो  असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं. आमचा व्यापक दृष्टीकोन आहे. राष्ट्रीय पक्ष असल्याने सर्व घटकपक्षांना एकत्र घेऊन पुढे जायचं आहे. त्यामुळे आज तरी अशी परिस्थिती दिसत नाही. भविष्यात ते व्यापक विचाराने चालणार असतील तर त्यावेळी विचार केला जाईल, असं सूचक वक्तव्य माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments