Placeholder canvas
Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईदाऊदचा जुना हस्तक गॅंगस्टर एजाज लकडावालाला बेड्या

दाऊदचा जुना हस्तक गॅंगस्टर एजाज लकडावालाला बेड्या

Dawood Ibrahim Ejaz Lakdawala,Dawood Ibrahim, Ejaz Lakdawala,Dawood, Ibrahim, Ejaz, Lakdawala,Chhota Rajan,Chhota,Rajanमुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद आणि छोटा राजनचा जुना हस्तक, कुख्यात गॅंगस्टर एजाज लकडावालाला मुंबई गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. यामुळे मुंबई पोलिसांना मोठं यश मिळालं आहे. बिहारच्या पाटण्यातून एजाज लकडावालाला पकडण्यात आलं. पोलिसांनी त्याला कोर्टात हजर केलं असता, कोर्टाने त्याला २१ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

दाऊद नंतर छोटा राजनचा होता हस्तक…

एजाज लकडावाला हा दाऊदचा अत्यंत जवळचा सहकारी होता. मात्र दाऊदसोबतच्या वादानंतर तो गँगस्टर छोटा राजनच्या टोळीत गेला होता. मुंबईत झालेल्या अनेक गुन्ह्यांमध्ये लकडावालाचा सहभाग होता. २००३ मध्ये एजाज लकडावालाचा मृत्यू झाल्याची अफवा पसरली होती. मात्र तो बँकॉकवरुन कॅनडाला पळून गेला होता. गेल्या अनेक वर्षांपासून तो तिथेच होता. लकडावालाने छोटा राजनशी हातमिळवणी केल्याने दाऊद नाराज असल्याची चर्चा होती. एजाज लकडावालावर जवळपास २५ पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत.

त्याच्या मुलीला झाली होती अटक…

एजाज लकडावालाची मुलगी सोनिया शेखला २८ डिसेंबररोजी मुंबई विमानतळावर अटक केली होती. सोनिया मनीष अडवाणी या बोगस नावाने पासपोर्ट बनवून नेपाळला निघाली होती. ती बोगस पासपोर्टवर देश सोडून जात होती. तिला अटक केल्यानंतर तिच्याकडे केलेल्या तपासात एजाज लकडावालाची माहिती उघड झाली होती. त्याद्वारे एजाज लकडावाला याचा माग काढून पोलिसांनी त्याला पाटणा येथून अटक केली.

छोट राजन गॅंगमधून या कारणामुळे वेगळा झाला

एजाज हा छोटा राजन गॅंगमध्ये होता. त्यापूर्वी तो दाऊद गॅंगमध्ये होता. छोटा राजनवर हल्ला झाल्यानंतर तो छोट राजन गॅंगमधून वेगळा झाला होता. देशाच्या विविध राज्यातही लकडावालाविरोधात गुन्हे दाखल आहेत.

एजाज लकडावाला हा ८ जानेवारी २०२० रोजी बिहारमध्ये येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तयारी केली होती. पोलिसांनी बिहारमधील पाटण्यातील जनकपूर इथे लकडावालाला पकडण्यात मुंबई पोलिसांना यश मिळाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments