Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रनवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी हार्बर रुळाला तडा,प्रवाशांचे हाल

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी हार्बर रुळाला तडा,प्रवाशांचे हाल

मुंबई – हार्बर मार्गावर सकाळी साडेआठच्या सुमारास गोवंडी ते चेंबूर स्टेशन दरम्यान रुळाला तडे गेल्याने काहीकाळ लोकल सेवा ठप्प झाली होती. त्यामुळे आज पुन्हा हार्बर मार्गावरील प्रवाशांना कार्यालयात जाण्यासाठी लेट मार्क लागला.

गोवंडी ते चेंबूर स्टेशन दरम्यान सीएसएमटीकडे जाणाऱ्या रुळाला तडा गेला. त्यानंतर लगेच रेल्वे कर्मचाऱ्यांनी तात्पुरत्या स्वरुपात दुरुस्ती करत लोकल सेवा काही वेळात सुरु केली असुन लोकल सध्या १० ते १५ मिनीटे उशिराने धावत आहेत. वर्षांच्या पहिल्याच दिवशी हार्बरवरील लोकल सेवा विस्कळीत झाल्याने रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले आणि प्रवाशांना त्यांचा नाहक त्रास झाला.

नवीन वर्षाची सुरुवात लेटमार्कने….
सकाळी सर्वांनाच कामावर जाण्याची घाई असते परंतु याच वेळी हार्बर रेल्वेस्थानकावर  रुळाला तडे गेले यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. नवीन वर्षाचा पहिलाच दिवा सर्वांचाच लेटमार्क झाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments