Placeholder canvas
Friday, May 3, 2024
Homeदेशतिहेरी तलाकविरोधातील याचिकाकर्ती इशरत जहाँ यांचा भाजपात प्रवेश

तिहेरी तलाकविरोधातील याचिकाकर्ती इशरत जहाँ यांचा भाजपात प्रवेश

कोलकाता – तिहेरी तलाकविरोधात याचिका दाखल करणाऱ्यांपैकी इशरत जहाँ या मुस्लीम महिलेने भारतीय जनता पक्षात प्रवेश करून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली आहे. या बाबतची माहिती पश्चिम बंगाल विभागाचे महासचिव शायंतन बसू यांनी दिली. इशरत या तिहेरी तलाकच्या पीडित आहेत.

भारतीय जनता पक्षाच्या हवडा विभागात शनिवारी इशरत यांचा योग्य सन्मान करण्यात आला आणि पक्षात प्रवेश देण्यात आला. राज्य पातळीवर मोठा कार्यक्रम घेऊन इशरत यांचे अभिनंदन करण्यात येणार आहे, अशी माहिती बसू यांनी दिली. इशरत या तिहेरी तलाकच्या पीडित आहेत. त्यांच्या पतीने २०१४ मध्ये दुबईहून फोनवरून तलाक दिला होता. इशरत यांनी पतीला संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तो फोन उचलत नव्हता.
एका नाट्यमय घडामोडीनंतर सर्वोच्च न्यायालयाने २२ ऑगस्ट २०१७ रोजी तिहेरी तलाकला असंवैधानिक ठरविले. तर नुकत्याच संसदीय अधिवेशनात, २८ डिसेंबर २०१७ रोजी लोकसभेत हे विधेयक मंजूर करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments