Placeholder canvas
Monday, May 6, 2024
Homeमहाराष्ट्रआता माझा अजित पवारांबरोबर संबंध नाही : धनंजय मुंडे

आता माझा अजित पवारांबरोबर संबंध नाही : धनंजय मुंडे

Dhananjay Mundeमुंबई : पक्षात असताना मी अजित पवारांसोबत होतो. आता माझा अजित पवारांबरोबर संबंध नाही अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.

राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 23 नोव्हेंबर रोजी बंडखोरी करत भाजपला समर्थन देत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे 10 ते 12 आमदारहीसोबत होते. तसेच राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडेंचाही यामध्ये समावेश होता, अशी चर्चा सुरु झाली होती. मात्र यावर धनंजय मुंडेंनी स्पष्टीकरण दिले आहे. मी राष्ट्रवादीचा एकमेव निष्ठावंत कार्यकर्ता आहे, असं मुंडेंनी सांगितले.

“मी राष्ट्रवादीचा एकमेव निष्ठावंत कार्यकर्ता आहे. मी शरद पवार यांच्यासोबतच आहे. त्यादिवशी घटना घडली तेव्हा मी एक वाजेपर्यंत झोपलेला होतो. मला याबद्दल काही माहित नव्हते. त्यामुळे मला माध्यमांसमोर यायला वेळ लागला”, असं धनंजय मुंडे म्हणाले.

निवडणूक सगळ्यांनी एकत्र लढवली. पण त्यानंतर अजित पवार यांनी वेगळा निर्णय घेतला तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. माझे अजित पवार यांच्यावर प्रेम ही गोष्ट वेगळी आहे. पण त्यांनी घेतलेल्या निर्णय हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे”, असंही मुंडेंनी सांगितले.

मुंडे म्हणाले, “माझ्या बंगल्यावर काय झाले हे मला माहित नाही, तो सार्वजनिक आहे. मला याबद्दल काही माहित नव्हते. त्या दिवशी मी बंगल्यावर नव्हतो. असंही मुंडे यांनी सांगितलं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments