Placeholder canvas
Saturday, May 4, 2024
Homeउत्तर महाराष्‍ट्रनाशिकअबब्...! पोटातून काढली ‘७२’ नाणी!!

अबब्…! पोटातून काढली ‘७२’ नाणी!!

नाशिक :-  एका इसमाच्या पोटातून ७२ नाणी आढळल्या. असे सांगितल्यावर विश्वास बसणार नाही. परंतु हे सत्य आहे. पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यातील थोरातपाडा या छोट्याशा आदिवासी पाड्यात राहणाऱ्या व्यक्तीच्या पोटातून या नाणी काढण्याची घटना समोर आली.

कृष्णा सोमल्या सांबर वय ५० असे त्या रुग्णाचे नाव आहे. ‘बेझॉर’ वा ‘पायका’ या नावाने ओळखल्या जाणा-या मानसिक आजाराने ग्रस्त होता. कॅनडा कॉर्नरवरील एका खासगी हॉस्पिटलमध्ये ही एण्डोस्कोपी करण्यात आली़ या आजाराने ग्रस्त रुग्णास खडू, केस वा माती यासारख्या वस्तू खाण्याचा मोह होतो; मात्र, या रुग्णास चक्क लोखंड अर्थात चलनातील नाणी गिळण्याचीच सवय जडली होती. डॉ़. अमित केले यांनी सुमारे साडेतीन तास शस्त्रक्रिया करून या रुग्णाच्या पोटातून एक, दोन, पाच व दहा रुपयांची ही ७२ नाणी बाहेर काढून जीवदान दिले.
पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यातील थोरातपाडा या छोट्याशा आदिवासी पाड्यावर बेझॉर वा पायका मानसिक आजार झालेला पन्नास वर्षीय कृष्णा सोमल्या सांबर हा पत्नी ताई व आपल्या पाच मुलांसह राहतो. दारुचे व्यसन होते तसेच तो मानसिक आजाराने त्रस्त होता. कृष्णा गत वीस वर्षांपासून लोखंडी वस्तू, पैसे गिळण्याचा सवय जडली होती़. तरुणपणी गिळलेली काही नाणी गुद्द्वारामार्फत बाहेर पडली तर काही पोटातील जठराच्या आतील भागात अडकून पडली. गत तीन वर्षांपासून सतत उलटया व खाल्लेले अन्न पचत नसल्याने त्याने कल्याण तसेच काही खासगी हॉस्पिटलमध्ये तपासणी केली, मात्र निदान झाले नव्हते.
पाणी व ज्युस यावर गत तीन वर्षांपासून जगत असलेल्या कृष्णाची प्रकृती अत्यंत खराब झाल्याने त्याच्या कुटुंबियांच्या ओळखीतून त्यास कॅनडा कॉर्नरवरील एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले़ तेथील सर्जन व एण्डोस्कोपीतज्ज्ञ डॉ़. अमित केले यांनी प्रथम कृष्णाच्या पोटाचा एक्सरे काढला त्यामध्ये जठराच्या आतील भागात केवळ एक धातुचा तुकडा असल्याचे दिसत होते़ त्यामुळे डॉक्टर केले यांनी एण्डोस्कोपीचा निर्णय घेतला मात्र जठरामध्ये अन्न असल्याने प्रथम ते साफ करण्यात आले़ यानंतर एण्डोस्कोपीमध्ये कृष्णाच्या जठरामध्ये चलनातील नाणी असल्याचे दिसले. हॉस्पीटलमधील स्टाफच्या सहकार्याने सुमारे साडेतीन तासांच्या कालावधीत कृष्णाच्या पोटातील जठरातून ७२ नाणी बाहेर काढली. यानंतर सुमारे दोन तासातच रुग्ण कृष्णा हा शुद्धीवर आला व त्याचा त्रासही कमी झाला. या प्रकारावरुन सर्वत्र आश्चर्यव्यक्त करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments