skip to content
Saturday, May 18, 2024
Homeदेशउत्तर प्रदेश: पालिका निवडणूकांमध्ये भाजपा अव्वल

उत्तर प्रदेश: पालिका निवडणूकांमध्ये भाजपा अव्वल

उत्तर प्रदेश: उत्तर प्रदेशच्या विधानसभा काबीज केल्यानंतर भाजपने पुन्हा एकदा राज्यातील पालिका निवडणुकांमध्ये अभुतपूर्व यश मिळवित घोडदौड कायम ठेवली आहे. महापौरपदांच्या १६ पैकी १४ जागांवर भाजपने दणदणीत विजय मिळवला. यात बहुजन समाज पक्षाने (बसपा) २ जागांवर विजय मिळवला आहे. दरम्यान, या निवडणूकीत समाजवादी पार्टी आणि काँग्रेस या पक्षांना सडकून पराजयाचा सामना करावा लागला.

काँग्रेसला आपली पारंपारिक अमेठीची जागाही राखता आलेली नाही. या जागेवर भाजपचा महापौर विराजमान झाला आहे. मात्र, बसपाने अलिगढ आणि मिरतच्या जागा खेचून आणल्या असून या दोन्ही ठिकाणी बसपाच्या उमेदवारांची महापौरपदी निवड झाली आहे.  हा विजय पक्षासाठी नवसंजीवनी ठरला आहे.

भाजपच्या अभूतपूर्व यशाबद्दल प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, आम्हाला अधिक जबाबदारीने काम करण्यासाठी या निवडणूका कारणीभूत ठरणार आहेत. सर्व विरोधकांचे डोळे उघडणारी ही निवडणूक असून जे लोक या निवडणूकांना गुजरात विधानसभा निवडणूकांशी जोडू पाहत आहेत, त्यांचे डोळे देखील उघडणाऱ्या आहेत. यावेळी त्यांनी सर्व मतदारांचे तसेच भाजप कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत.

येथील सर्व १६ जागांवरील नवनियुक्त महापौरांच्या नावांची यादी : 

आग्रा – नवीन जैन (भाजप)
अलीगढ़ – मोहम्मद फुरकान (बसपा)
वाराणसी – मृदुला जैयसवाल (भाजप)
गोरखपूर – सीताराम जैयसवाल (भाजप)
कानपूर – प्रमिला पांडे (भाजप)
फिरोजाबाद – नूतन राठोड (भाजप)
गाजियाबाद – आशा शर्मा (भाजप)
लखनऊ – संयुक्ता भाटिया (भाजप)
सहारनपूर – संजीव वालिया (भाजप)
मथूरा – मुकेश आर्य बंधू (भाजप)
अयोध्या – ऋषिकेश उपाध्याय (भाजप)
अलाहाबाद – अभिलाषा गुप्ता (भाजप)
मुरादाबाद – विनोद अग्रवाल (भाजप)
झांसी – रामतीर्थ सिंघल (भाजप)
बरेली – उमेश गौतम (भाजप) आघाडीवर
मेरठ – सुनीता वर्मा (बसपा) आघाडीवर

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments