Tuesday, December 3, 2024
Homeउत्तर महाराष्‍ट्रजळगावजळगाव शहरात ११ ते १५ मार्च ‘जनता कर्फ्यू’

जळगाव शहरात ११ ते १५ मार्च ‘जनता कर्फ्यू’

coronavirus-public-curfew-in-jalgaon-from-march-11-to-15
coronavirus-public-curfew-in-jalgaon-from-march-11-to-15

जळगाव: राज्यात कोरोनाचा उद्रेक दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. मुंबई,औरंगाबाद,अमरावती, पुणे नाशिक या प्रमुख शहरांच्या पाठोपाठ सर्वच शहरांमध्ये कोरोनाचे रूग्ण मोठ्या संख्येने आढळून येत आहेत.

संसर्ग आटोक्यात आणण्यासाठीर तेथील स्थानिक प्रशासन विविध उपाय योजनांची अंमलबाजावणी करत आहे. या पार्श्वभूमीवर आज जळगावमध्ये जनता कर्फ्युची घोषणा करण्यात आली आहे. ११ ते १५ मार्च या कालावधीत जळगाव शहरात जनता कर्फ्यू असणार असं जळगावचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी जाहीर केलं आहे.

जळगाव शहर महानगरपालिका हद्दीत ११ मार्च २०२१ रोजी रात्री ८ वाजेपासून ते १५ मार्च २०२१ रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत जनता कर्फ्यू घोषित करण्याबाबतची नियमावली जाहीर करण्यात येत असून, नागिराकांनी या कालावधीत स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्याबाबत जाहीर आवाहन करण्यात येत आहे. असं जिल्हाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments