Placeholder canvas
Wednesday, May 1, 2024
Homeउत्तर महाराष्‍ट्रअहमदनगरसंतापजनक: चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून, पेट्रोल टाकून मृतदेह जाळला!

संतापजनक: चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून, पेट्रोल टाकून मृतदेह जाळला!

अहमदनगर: हिंगणघाट, सिल्लोडची घटना ताजी असताना अहमदनगर जिल्ह्यात संतापजनक घटना घडली. चारित्र्याच्या संशयावरून पतीनं पत्नीचा शेतात खून करून मृतदेह पेट्रोल टाकून जाळला आहे. पत्नीचा खून केल्यानंतर पती सुनील लेंडे हा स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला आणि पत्नीचा खून केल्याची कबुली त्यानं पोलिसांकडे दिली. लेंडेविरुध्द खूनाचा गुन्हा नोंदवून त्याला अटक करण्यात आली आहे. ही घटना राहाता तालुक्यातील एकरुखे गावात ही घटना घडली आहे.

डोक्यात लाकडी दांडका मारुन हत्या

सुनील लेंडे हा नेहमीच पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. दोघांमध्ये नेहमीच खटके उडत होते. त्यानंतर शनिवारी संध्याकाळी पत्नी शेतात गेल्यानंतर सुनील याने पत्नीच्या डोक्यात लाकडी दांडके मारून तिला जखमी केले. यात तिचा मृत्यू झाला. त्यानंतर पत्नीचा मृतदेह शेतात ठेवून तो घरी आला. पत्नीच्या नातेवाइकाचे निधन झाले असून, ती माहेरी गेली असल्याचे सुनीलने आपल्या आई-वडिलांना सांगितले. त्याच्या मुलांना आई-वडिलांसोबत पत्नीच्या माहेरी पाठवून दिले. त्यानंतर रात्री एक पोते व पेट्रोल नेऊन पत्नीला शेतापासून जवळच अंतरावर जाळून टाकले. त्यानंतर स्वतःहून तो राहाता पोलीस ठाण्यात हजर होऊन पत्नीचा खून केल्याचे सांगितले. सुनील याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर छाया हिचा भाऊ सुनील तरस (खैरी निमगाव, श्रीरामपूर) याच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध खूनाचा गुन्हा नोंदवून त्याला अटक आली. पुढील तपास पोलीस करत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments