Placeholder canvas
Wednesday, May 1, 2024
Homeविदर्भनागपूरनितीन गडकरी यांच्या फार्महाऊसवर स्फोट, एकाचा मृत्यू

नितीन गडकरी यांच्या फार्महाऊसवर स्फोट, एकाचा मृत्यू

नागपूर- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या धापेवाडा येथील शेतातील फार्महाऊसवर प्रेशर कुकरचा स्फोट होऊन एका शेतमजुराचा मृत्यू झाला आहे. प्रदीप महादेव श्रीराव (वय- ४५, रा. धापेवाडा) असे मृत कामगाराचे नाव आहे. मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

मिळालेली मा‍हिती अशी की, नितीन गडकरी यांची पत्नी कांचन गडकरी यांच्या मालकीची कांचन इंडिया ही सौंदर्य प्रसाधन कंपनी आहे. कंपनीसाठी आवश्यक उत्पादन त्यांच्या फार्महाऊस परीसरात घेतले जाते. हळद शिजवण्यासाठी कुकरचा वापर सुरू होता. अचानक स्फोट झाल्याने प्रदीप हे गंभीर जखमी झाले. त्यांना हॉ‍स्पिटलमध्ये नेत असताना त्यांचा मृत्यू झाला. कळमेश्वर पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूच्या घटनेची नोंद केली असून तपास सुरू केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments