बंगळुरु : काँग्रेस आणि जेडीएस आघाडीने जणू भाजपच्या तोंडाचा घासच काढून घेतला आहे, अशी सर्वत्र चर्चा सुरू आहे. कर्नाटक मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी एच डी कुमारस्वामी यांनी कर्नाटकसाठी चांगली बातमी दिलेय. कर्नाटक सत्ता संघर्षानंतर आता काँग्रेस आणि जेडीएस आघाडीचे सरकार सत्तेत बसणार आहे. मुख्यमंत्री म्हणून जेडीएसचे नेते कुमारस्वामी हे शपथ घेणार आहेत. त्याआधी त्यांनी मोठी बाब स्पष्ट केलेय. जे निवडणुकीपूर्वी निर्णय घेतलेय आणि ज्या घोषणा केल्या आहेत. त्यादृष्टीने प्रयत्न केले जातील, असे कुमारस्वामी म्हणालेत.
All the promises made in the manifesto will be implemented. Safeguarding the interest of the farming community is our top priority: #Karnataka CM designate HD Kumaraswamy pic.twitter.com/wq7lLmbwgD
— ANI (@ANI) May 23, 2018
कर्नाटकात जेडीएस आणि काँग्रेस आघाडीचे सरकार स्थापन होत आहे. निवडणुकी जी आश्वासने जनतेला दिलेली आहेत. ती पूर्ण करण्यावर आमचा भर राहिल. शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत. ते सोडविण्यावर भर राहिल. शेतकरी हिताचे निर्णय आणि त्यांची सुरक्षा घेण्यावर आमची सर्वोच्च प्राथमिकता असेल, असे कुमारस्वामी यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले.
जेडीएस आणि काँग्रेस आघाडी सरकारचे नेतृत्व कुमारस्वामी करत आहेत. ते आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत. या शपथविधी सोहळ्यासाठी अनेक नेत्यांना आणि मुख्यमंत्र्यांना निमंत्रण देण्यात आले आहे. दरम्यान, काँग्रेसचे प्रभारी महासचिव के सी वेणुगोपाल यांनी सांगितले की, कर्नाटक पार्टीचे अध्यक्ष परमेश्वर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. तर काँग्रेसचे रमेश कुमार विधानसभा अध्यक्ष होतील. तर विधानसभा उपाध्यक्ष पद जेडीएसकडे असेल.