Placeholder canvas
Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रराष्ट्रवादीचा बुधवारी विधानभवनावर हल्ला बोल!

राष्ट्रवादीचा बुधवारी विधानभवनावर हल्ला बोल!

मुंबई: मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने महाराष्ट्रातील युती सरकारच्या विरोधात विधानभवनावर हल्ला बोल  आंदोलन बुधवार दिनांक २८ फेब्रुवारी २०१८ रोजी दुपारी १२ वाजता आयोजित करण्यात आले आहे. 

मोर्चा का?…

दिवसेंदिवस होणारी वाढती महागाई, गृहनिर्माण धोरणातील त्रुटी, कामगार विरोधी धोरण, शासकीय व निमशासकीय क्षेत्रातील रद्द केलेली पदे, नोटबंदी व GST मुळे अडचणीत आलेले लघू उद्योग, महिलांवरील वाढते अत्याचार, मुंबई विद्यापीठाच्या चुकीच्या शैक्षणिक धोरणांमुळे विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान, आरक्षण, खोट्या नि फसव्या जाहिरातींवर होणारा वारेमाप खर्च, छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जागतिक दर्जाची स्मारक बांधणी विलंब अशा विविध विषयावर हल्लाबोल होणार आहे.

यांची राहणार उपस्थिती

या मोर्चाला आझाद मैदानामध्ये पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार, खा.प्रफ्फुल पटेल, खा. माजीद मेमन, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, विधीमंडळ सभागृह नेते अजितदादा पवार, विधानसभा गटनेते जयंतराव पाटील, खा.सुप्रियाताई सुळे, विरोधी पक्ष नेते ना. धनंजय मुंडे, मा.मंत्री गणेश नाईक, आमदार शशिकांत शिंदे, आमदार जितेंद्र आव्हाड, राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, आ.विद्याताई चव्हाण, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ आणि आमदार किरण पावसकर हे संबोधित करणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments