Placeholder canvas
Tuesday, May 7, 2024
Homeमहाराष्ट्र‘राष्ट्रीय गोकुळ मिशन’मध्ये पश्चिम विभागातून महाराष्ट्र सर्वोत्कृष्ट सात पुरस्कारांवर राज्याची मोहोर

‘राष्ट्रीय गोकुळ मिशन’मध्ये पश्चिम विभागातून महाराष्ट्र सर्वोत्कृष्ट सात पुरस्कारांवर राज्याची मोहोर

मुंबई : केंद्र पुरस्कृत ‘राष्ट्रीय गोकुळ मिशन’अंतर्गत पशुसंवर्धन क्षेत्रातील कार्याबद्दल दिल्या जाणाऱ्या सर्वोत्कृष्ट राज्य पुरस्काराचा पश्चिम विभागातील बहुमान महाराष्ट्र राज्याने पटकावला असून या पुरस्कारासह एकूण सात पुरस्कारावर राज्याने मोहोर उमटवली आहे.

केंद्र शासनाकडून देशातील चार विभागांतर्गत हे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. पश्चिम विभागामध्ये महाराष्ट्रासह, गुजरात, मध्य प्रदेश, गोवा, छत्तीसगड या राज्यांचा तसेच दादरा व नगर हवेली आणि दीव- दमण या केंद्र शासित प्रदेशांचा समावेश आहे. यामध्ये राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार, राष्ट्रीय गोकुळ मिशनची उत्कृष्ट अंमलबजावणी, उत्कृष्ट पशुवैद्यक, उत्कृष्ट कृत्रिम रेतन सेवा पुरस्कार तसेच सर्वोत्कृष्ट राज्य पुरस्कार राज्याला प्राप्त झाले आहेत.

पश्चिम विभागातील सर्वोत्कृष्ट राज्याच्या पुरस्कारासाठी पशुधनाची उत्पादकता, पशुवैद्यकीय  सेवेचा दर्जा, रोग नियंत्रण, पशुप्रजनन कार्यक्रमाची उत्कृष्ट अंमलबजावणी, कृत्रिम रेतनाचे काम, रोग प्रादुर्भावासंदर्भातील माहिती केंद्र शासनाच्या पोर्टलवर भरण्यास प्रतिसाद, केंद्र पुरस्कृत योजनांची अंमलबजावणी, पशुसंवर्धन योजनांची माहिती पशुपालकांपर्यंत  पोहोचविण्याचा विस्तार कार्यक्रमाची उत्कृष्ट अंमलबजावणी आदी बाबींचा विचार करण्यात आला. देशी गोवंश तसेच म्हशींच्या जातींचे जतन व संवर्धन यावर ‘राष्ट्रीय गोकुळ  मिशन’मध्ये विशेष भर देण्यात आला आहे.

          पशुधन सेवांचा विस्तार प्रत्येक पशुपालकापर्यंत पोहोचण्यासाठी राज्य शासनाचे गेल्या तीन-चार वर्षात खूपच मेहनत घेतली आहे. आपल्या देशी गोवंश आणि म्हशींच्या जातींचे महत्त्व विकसित देशांनाही समजले आहे. त्यामुळे आपल्याकडील देशी जातींचे जतन व संवर्धन करण्यासाठी विभाग अविरत कार्य करीत आहे. त्याचा आजच्या पुरस्कारांच्या माध्यमातून सन्मान झाल्याचा आनंद आहे

महादेव जानकर,

                                                 मंत्री, पशुसवंर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकास

सर्वोत्कृष्ट राज्य पुरस्कारसह पुढील पुरस्कार राज्याला प्राप्त झाले आहेत.

* राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार : प्रथम पुरस्कार- अनिरुद्ध भगिरथ पाटील, तरसाली, ता. बागलाण, जि. नाशिक

* उत्कृष्ट पशुवैद्यक पुरस्कार :

प्रथम पुरस्कार- डॉ. अनिल तुळशीराम परिहार, सहायक पशुसंवर्धन आयुक्त, तालुका लघु पशुवैद्यकीय रुग्णालय, कराड (जि. सातारा)

द्वितीय पुरस्कार- डॉ. दिनकर भाऊराव बोर्डे, सहायक पशुसंवर्धन आयुक्त, तालुका लघु पशुवैद्यकीय रुग्णालय, पंढरपूर (जि. सोलापूर)

* उत्कृष्ट कृत्रिम रेतन तंत्रज्ञ पुरस्कार :

द्वितीय पुरस्कार- बाळासाहेब तुकाराम कोल्हे, कृत्रिम रेतन तंत्रज्ञ, बायफ, सोनेवाडी, ता. कोपरगाव (जि. अहमदनगर)

द्वितीय पुरस्कार- डॉ. अनिल विठ्ठलराव इंगोले, पशुधन विकास अधिकारी, सासवड (जि. पुणे)

* राष्ट्रीय गोकुळ मिशनची उत्कृष्ट अंमलबजावणी : प्रथम पुरस्कार

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments