Placeholder canvas
Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रनारायण राणेंना आठ महिने आमदारकीचा चकवा!

नारायण राणेंना आठ महिने आमदारकीचा चकवा!

मुंबई: भाजपतर्फे विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी नारायण राणेंचा पत्ता कट झाल्यामुळे राणेंना आठ महिण्यापर्यंत आमदारकीने चकवा दिला आहे. जुन महिण्यात राणेंना भाजपाच्या कोट्यातून संधी मिळू शकते. मात्र राणेंना मंत्रिपद दिले तर शिवसेनेचा विरोध कायम असण्याची शक्यता आहे. यामुळे राणेंचे मंत्रीपदाचे स्वप्न पूर्ण होतात की नाही हे काळ ठरवले.

विधान परिषद निवडणुकीत भाजपने नारायण राणे यांना उमेदवारी न देऊन शिवसेनेसोबत होणार संघर्ष टाळण्याचा प्रसाद लाड यांना उमेदवारी देऊ केली. पण, आता नारायण राणे यांना मंत्रिपदाचे आश्वासन दिल्यामुळे राणेंना काही काळ थांबावे लागणार आहे.

जून महिन्यात राज्यपालांद्वारे नामनियुक्त विधानपरिषदेतील १२ जागा रिक्त होणार आहेत. ७ आणि १६ जूनला राज्यपालांच्या कोट्यात राणेंचा नंबर लागू शकतो. जून महिन्यात रिक्त होणाऱ्या आणि सहजतेने निवडून येणाऱ्या भाजपच्या ५ जागा आहेत. मंत्रिमंडळात घेऊन ६ महिन्यात म्हणजे जूनमध्ये नारायण राणेंना निवडून आणता येऊ शकतंय.

त्यापूर्वी मार्च-एप्रिलमध्येही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कोट्यातील जागांवर निवडणुका आहेत. पण त्यावेळी राणेंची वर्णी लागण्याची शक्यता नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments