Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईकाँग्रेस महाआघाडीच्या पहिल्या यादीला आज मुहूर्त लागणार?

काँग्रेस महाआघाडीच्या पहिल्या यादीला आज मुहूर्त लागणार?

मुंबई : विधानसभेच्या महासंग्रामासाठी सर्वच राजकीय पक्ष मैदानात उतरण्यातसाठी सज्ज झाले आहेत. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे. काँग्रेस महाआघाडीची बैठक होत असून त्यामध्ये ऊमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

आज घटस्थापना असून युतीचा घट बसण्याची शक्यता आहे. काँग्रेस महाआघाडीने यंदा कोणताही वाद न करता, एकमताने आघाडीच्या उमेदवारीवरून एकमत झाले होते. युतीमध्ये जागावाटपावरून वाद सुरु होता. त्यावरून शिवसेना व मित्रपक्ष नाराज होते. त्यामुळे त्यांना सामावून घेणे व युती शाबूत ठेवणे हे भाजपासमोर मोठे आवाहन होते. त्यासाठी भाजपाने नमते घेतले होते. तर दुसरीकडे काँग्रेस महाआघाडीत दोन्ही पक्षांकडून जास्त न तानाताणी न करता एकदिलाने निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे.

आज महाआघाडीच्या बैठकीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, धनंजय मुंडे, अशोक चव्हाण, अजित पवार, रवी राणा, इतर महत्वाचे नेते मुंबईतील बैठकीत उपस्थितीत आहेत. त्यामुळे आघाडीच्या उमेदवारांच्या पहिल्या यादीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments