Placeholder canvas
Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईमुख्यमंत्र्याचे ‘पीए’ काँग्रेसच्या गडाला सुरुंग लावतील का?

मुख्यमंत्र्याचे ‘पीए’ काँग्रेसच्या गडाला सुरुंग लावतील का?

Abhimanyu Pawarमुंबई: विधानसभा निवडणुकीसाठी भाजपानं पहिली यादी जाहीर केली. यामध्ये १२५ जणांच्या नावांचा समावेश आहे. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पीए अभिमन्यू पवार यांना औसा मतदारसंघातून अखेर उमेदवारी मिळाली. मात्र हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला असून येथे मुख्यमंत्र्यांच पीए पवार सुरुंग लावतील का हे मुख्यमंत्र्यांसमोर मोठं आव्हान आहे.

लातूर जिल्ह्यातील औसा मतदारसंघात १९९९ आणि २००४ मध्ये शिवसेनेने हा मतदारसंघ जिंकला होता. तो अपवाद सोडला तर, या मतदरासंघावर काँग्रेसचे वर्चस्व राहिलेले आहे. त्यामुळे आता युतीमध्ये हा मतदारसंघ शिवसेनेला हवा होता परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांचे पीए अभिमन्यू पवार यांच्यासाठी इच्छूक होते. अखेर शिवसेने औसा मतदारसंघ भाजपला सोडला. आणि पहिल्या यादीत अभिमन्यू पवार यांचे नाव जाहीर करण्यात आली.

औसा मतदारसंघात काँग्रेसचे बसवराज पाटील हे विद्यमान आमदार आहेत. बसवराज पाटील यांनी २००९ मध्येही विजय मिळवला होता. या मतदारसंघावर काँग्रेसची पकड असल्यामुळे येथे तगडी फाईट होण्याची शक्यता आहे.

औसा विधानसभा मतदारसंघाचे आमदार बसवराज पाटील यांची प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्ष आहेत. बसवराज पाटील हे मूळचे उस्मानाबाद जिल्हय़ातील मुरुमचे रहिवासी आहेत. शिक्षण, सहकार व राजकारण या क्षेत्रांत त्यांनी आपला स्वतंत्र दबदबा निर्माण केला आहे. लातूरच्या राजकारणात बसवराज पाटलांनी ‘देवघरातून काँग्रेस देवाघरी नेली’ अशी त्यांच्यावर टीका झाली होती. विलासराव देशमुखही त्या काळी बसवराज पाटलांच्या कार्यशैलीवर नाराज होते. लातूर जिल्हय़ात विलासराव देशमुख म्हणतील तसेच राजकारण काँग्रेसमध्ये होत होते. बसवराज पाटलांनी धाडस करून देशमुखांच्या नेतृत्वाला आव्हान दिले होते.

बसवराज पाटील हे मुरुम नगर परिषदेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवडून आले होते. उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे संस्थापक अध्यक्ष होते. १९८२ साली युवक काँग्रेसच्या उमरगा तालुकाध्यक्षापासून त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली. १९९२ मध्ये जिल्हा परिषदेचे सदस्य व त्याच वेळी उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे ते उपाध्यक्ष झाले. १९९९ मध्ये उमरगा विधानसभा मतदारसंघाचे ते आमदार झाले व त्याच वेळी राज्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी आली. प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस म्हणूनही त्यांनी काम केले.

२००४ साली उमरगा विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला, मात्र त्यामुळे ते खचून गेले नाहीत. उमरगा विधानसभा मतदारसंघ राखीव झाल्यानंतर लातूर जिल्हय़ातील औसा विधानसभा मतदारसंघातून ते २००९ मध्ये निवडून आले. मराठवाडय़ातील आपला मतदारसंघ सोडून अन्य मतदारसंघात उभे राहून निवडून येणारे ते एकमेव आमदार आहेत.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा औशातून ते निवडून आले. उस्मानाबाद व लातूर या दोन जिल्हय़ांतील राजकारणात त्यांनी आजवर महत्त्वाची भूमिका बजावली आहे. दलित व मुस्लीम समाजांत त्यांचा अतिशय चांगला संपर्क आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती व परिसरातील नगर परिषदांवर त्यांचे कायम प्रभुत्व राहिले. त्यांनी उभारलेला विठ्ठल सहकारी साखर कारखानाही चांगला सुरू आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे ते मानसपुत्र मानले जातात. जिभेवर नियंत्रण ठेवून वागणारा नेता अशी त्यांची ओळख आहे. त्यामुळे औसा मतदारंसघात लढाई सोपी नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments