Placeholder canvas
Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रबायकोचा पगार माझ्या पगारापेक्षा जास्त : देवेंद्र फडणवीस

बायकोचा पगार माझ्या पगारापेक्षा जास्त : देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis-Amruta Fadnavisमुंबई : माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या अर्थसंकल्प सोप्या भाषेत या पुस्तकाचं आज प्रकाशन झालं. विशेष म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी तिन्ही नेत्यांमध्ये चांगलीच जुगलबंदी रंगली.

‘अर्थसंकल्प हा सर्व सामान्य माणसाला सहज शब्दात समजावा यासाठी हे पुस्तक लिहिलं आहे. त्यामुळे हे पुस्तक अवघ्या ४० मिनिटामध्ये वाचता येईल. आपण जेव्हा घरचं बजेट तयार करतो तेव्हा सगळ्या गोष्टींचा विचार करतो. घरात बायकोचा पगार किती आपला किती पगार आहे, याच्यावर घरचं बजेट तयार करतो. माझ्या पत्नीचा पगार हा माझ्या पगारापेक्षा जास्त आहे. त्यामुळे तो मला जास्त लक्षात राहतो’, अशी कबुली देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

दहा पंधरा वर्ष आमच्या अर्थसंकल्पावर पुस्तक लिहीत राहा : उद्धव ठाकरे

देवेंद्र फडणवीस यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चौफेर फटकेबाजी केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मला अर्थसंकल्प समजावा यासाठीच हे पुस्तक लिहिलं आहे. मला वाटलं नव्हतं, या विषयावर बोलण्याची माझ्यावर ही वेळ येईल पण ही वेळ माझ्यावर देवेंद्र फडणवीस तुमच्यामुळेच आल्याचा टोला उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना लगावला. तसंच, ‘तुम्ही असेच आमच्या अर्थसंकल्पांवर पुस्तकं लिहीत राहा’, अशा मिश्किल शुभेच्छा उद्धव ठाकरेंनी दिल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments