Placeholder canvas
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईस्थिर सरकारसाठी काँग्रेस आघाडीचे हालही पचवू : उध्दव ठाकरे

स्थिर सरकारसाठी काँग्रेस आघाडीचे हालही पचवू : उध्दव ठाकरे

uddhav thackeray said that Maharashtra Chief Minister will be from Shiv Senaमुंबई: राज्यात सत्तास्थापण्याआधीच राज्यपालांनी राष्ट्रपती राजवट लागू केली. दरम्यान शिवसेनेतर्फे पुन्हा एकदा भाजपावर निशाणा साधण्यात आला. महाराष्ट्रात स्थिर सरकार देण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचं हालही पचवू अशी टीका केली.

भाजप दिलेल्या शब्दापासून पाठ फिरवली. ठरल्याप्रमाणे वागला असता तर आज अशी परिस्थिती आली नसती. तत्व, नितीमत्ता, संस्कारातल्या भाजपाने हे गुण महाराष्ट्रातही दाखवायला हवे होते. कोणत्याही परिस्थितीत सत्ता स्थापन होऊ द्यायची नाही आणि राजभवनाच्या झाडाखाली बसून पत्ते पिसायचे हा खेळ सुरु असल्याची टीका करण्यात आली आहे.

शिवसेनेच्या या टीकेमुळे राज्यात शिवसेना आणि भाजप सोबत येणार नाहीत हे जवळपास निश्चित झाल आहे. त्यामुळे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी सरकार स्थापन करणार हे जवळपास निश्चित झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments