Placeholder canvas
Tuesday, May 7, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईएकनाथ खडसेंची 'ही' मागणी उध्दव ठाकरेंनी केली पूर्ण

एकनाथ खडसेंची ‘ही’ मागणी उध्दव ठाकरेंनी केली पूर्ण

Meeting of Uddhav Thackeray and Shiv Sena MPs at Matoshreeमुंबई: भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री भाजपमध्ये नाराज आहेत. त्यांनी आज मंगळवारी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंची भेट घेतली. या दोघांमध्ये जवळपास 40 मिनिटे चर्चा झाली. त्यावेळी विविध विषयांवर दोघांमध्ये मुख्यमंत्र्यांच्या एन्टी चेंबरमध्ये चर्चा झाली.

या भेटीदरम्यान एकनाथ खडसे यांनी उद्धव ठाकरेंकडे आपण स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाचा मुद्दा उपस्थित केला असल्याचं सांगितलं. गोपीनाथ मुंडे यांचं स्मारक औरंगाबाद येथे उभं राहावं यासाठी आपण जमीन उपलब्ध करुन दिली होती. मात्र स्मारक अद्याप उभं राहू शकलेलं नाही. या स्मारकासाठी जास्त नाही ३० ते ४० कोटींचा खर्च आहे. मी उद्धव ठाकरे यांच्याकडे आपल्या माध्यमातून घोषणा व्हावी, अशी विनंती केली असल्याची माहिती त्यांनी दिली.

उद्धव ठाकरे यांनी ही मागणी मान्य केली आहे. आम्ही प्राधान्याने स्मारकासाठी निधी उपलब्ध करुन देऊ असं आश्वासन त्यांनी दिलं आहे. तसंच आवश्यकता असेल तर तिथला दौरा असेल त्यावेळी जागेला भेट देऊ असंही ते म्हणाले आहेत, अशी माहिती एकनाथ खडसे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments