Placeholder canvas
Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबई‘आरटीआय’च्या नावाखाली खंडणी मागणाऱ्या दोघांना अटक

‘आरटीआय’च्या नावाखाली खंडणी मागणाऱ्या दोघांना अटक

Two men arrested For Extortion By Posing As RTI Activistsमुंबई : उपनगरातील सांताक्रूझच्या एका शिल्पकाराकडून माहितीचा अधिकार (आरटीआय) कार्यकर्ते म्हणून खंडणी मागण्याच्या आरोपाखाली दोघांना अटक करण्यात आली आहे. असी माहिती पोलिसांनी गुरुवारी दिली. शिल्पकार मंगेश भगत यांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे आरोपी दिनेश सिंग आणि रमेश परदेशी यांना बुधवारी रात्री उशिरा वाकोला पोलिसांनी अटक केली.

मंगेश भगत यांनी आवश्यक अशा परवानग्या न घेता घरच्या वस्तू मध्ये बदल केल्याच्या आरोपावरून दोघांनी २० हजार रुपयांच्या खंडणीची मागणी केली. दिनेश आणि रमेश यांनी तक्रारदाराला सांगितले की ते आरटीआय कार्यकर्ते आहेत आणि त्यांनी मागितलेली खंडणी न दिल्यास ते बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) कडे त्यांची तक्रार करतील. या दबावाखाली भगत यांनी त्यांना चार हजार रुपये दिले. अशी माहिती वकोला पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक कैलास आव्हाड यांनी दिली.

Two men arrested For Extortion By Posing As RTI Activists vakola police station vakola police station

दिनेश सिंग आणि रमेश परदेशी हे आरटीआय च्या माध्यमातून नियमितपणे बीएमसी आणि विविध सरकारी विभागांकडे विविध विषयांवर तक्रारी दाखल करत असे. खंडणीच्या आरोपाखाली त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती आव्हाड यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments