Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबई... म्हणून गोपाल शेट्टी यांनी बोरीवलीत गांधी स्मारकाची मागणी केली

… म्हणून गोपाल शेट्टी यांनी बोरीवलीत गांधी स्मारकाची मागणी केली

पंतप्रधान मोदी यांनी आम्हा खासदारांना अनेक उपक्रम दिले आहेत. त्यांपैकी १५० किमी पदयात्रा हा देखील एक उपक्रम आहे. यंदाच वर्ष हे महात्मा गांधी यांच्या १५०व्या जयंतीचे वर्ष आहे. ही १५० किमीची पदयात्रा म्हणजे महात्मा गांधींना आमची आदरांजली आहे, असे मत शेट्टी यांनी व्यक्त केले.

गोपाल शेट्टी यांनी संसदेत निवेदन केले कि ”महात्मा गांधी यांनी देशातील सर्व राज्याचे भ्रमन केले त्याप्रमाणेच त्यांनी मुंबई चे भ्रमन केले, १९४२ साली ऑगस्ट क्रांती मोर्चाच्या माध्यमातून त्यांनी ब्रिटिशांना ‘चले जाव’ चा नारा दिला. त्याच दरम्यान गांधी बोरीवली मधील कोराकेंद्र येथे देखील आले होते. आत्ता त्या जागी छोठी कोठी राहीली आहे ,त्या जागी आधी मडके, झेंडे, अगरबत्ती, साबण, सुती कापड तयार केले जात होते परंतु स्वातंत्रानंतर हे उद्योग कालांतराने बंद पडले. हे ठिकाण विलुप्त होत आहे. त्यामुळे मी केंद्र सरकारला निवेदन करतो कि त्या ठिकाणी मोठा स्मारक बांधावे व येणाऱ्या पिढ्यांना गांधीजी बद्दल माहिती मिळावी त्यातून देशाप्रती निष्ठा वाढण्यास मदत होईल.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments