Placeholder canvas
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईभीमा कोरेगाव आंदोलनातील गुन्हे सरकार मागे घेणार- मुख्यमंत्री

भीमा कोरेगाव आंदोलनातील गुन्हे सरकार मागे घेणार- मुख्यमंत्री

मुंबई: भीमा कोरेगाव दंगली नंतर झालेल्या आंदोलनातील सर्व गुन्हे मागे घेणार, तसेच आंदोलनात दरम्यान झालेली नुकसान भरपाई सरकार देणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळात अधिवेशना दरम्यान दिली. दलित संघटनांनी गुन्हे मागे घेण्याची विनंती केली होती.

१ जानेवारी रोजी भीमा कोरगाव विजय दिवसानंतर मराठा व दलित समाजात दंगल उसळली होती. त्यानंतर भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी ३ जानेवारी रोजी महाराष्ट्र बंद ची हाक दिली होती. बंद दरम्यान जाळपोळ,तोडफोड,चक्काजाम च्या घटना घडल्या होत्या. यावेळी दलित संघटनांच्या कार्यकर्त्यांना अटक झाली होती व विविध गुन्हे दाखल करण्यात आले होते. सर्व गुन्हे मागे घेण्यात येणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments