Placeholder canvas
Monday, May 6, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईविक्रोळीत पोलिसाची गळफास घेऊन आत्महत्या

विक्रोळीत पोलिसाची गळफास घेऊन आत्महत्या

मुंबई – मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षामध्ये कार्यरत रामेश्वर हंकारे (29) यांनी विक्रोळी येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

हंकारे हे मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षामध्ये कार्यरत होते. सोमवारी संध्याकाळी हंकारे यांचे सहकारी घरी परतले होते. दरम्यान घराचा दरवाजा आतून बंद होता. यानंतर त्यांनी वारंवार दार वाजवूनही पाहिला. मात्र त्यांनी दार उघडलं नाही. यामुळे त्यांनी खिडकीतून वाकून पाहिलं तेव्हा हंकारे यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पुढील तपास पोलीस करत आहेत.
घरात सापडली चिठ्ठी…
हंकारे यांच्या घरामधून एक चिठ्ठी सापडली आहे. या चिठ्ठीच्या आधारावर आता पुढील तपास सुरू आहे. मात्र, कोणत्या कारणामुळे आत्महत्या करण्यात आली ते कळू शकले नाही.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments