Sunday, May 5, 2024
Homeमहाराष्ट्रडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बेस्टच्या विशेष गाड्या

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बेस्टच्या विशेष गाड्या

Dr Babasaheb Ambedkarमुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त १४ एप्रिल रोजी अनुयायी मोठ्या संख्येने चैत्यभूमिवर अभिवादन करण्यासाठी येत असतात. या दिवशी अनुयायांच्या सोयीसाठी सकाळी ६ ते रात्री १० यावेळेत बेस्ट प्रशासनाने विशेष गाड्या सोडल्या आहेत.

विशेष गाड्यांचे वेळापत्रक असे आहेत….
बस क्रमांक            ठिकाण                                                                         वेळ

दादर फेरी-२     दादर स्टेशन ते शिवाजी पार्क                                          स. ६ ते रा. १०

१८८                 बोरीवली स्था.(पूर्व) ते कान्हेरी गुंफा                                  स. ९ ते रा. ७

२७१                मालाड स्था.(पश्चिम) ते मार्वे बीच                                        स.९ ते रा. ७
२७४ व २९४    बोरीवली स्था. (पश्चिम) गोराई खाडी                                सकाळपासून रात्री १० पर्यंत

बाबासाहेबांच्या स्मृतिस्थळांना भेट देणाऱ्यांसाठी विशेष सेवा…
मुंबई शहरातील विविध भागांतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिस्थळांना तसेच वस्तूंना भेट देण्याची इच्छा असणाऱ्या प्रवाशांसाठी बेस्टच्या वतीने विशेष बस फेऱ्यांचे आयोजन करण्यात आले आहे. शिवाजी पार्क येथून चालवण्यात येणाऱ्या या बस सेवेकरिता प्रति प्रवासी १५० रुपये इतके प्रवास भाडे  आकारण्यात आले आहे. या विशेष बसफेऱ्या सकाळी ८, ८.३०, ९, साडे ९ आणि १० वाजता शिवाजी पार्क येथून चालवण्यात येतील. तसेच माटुंगा परिसरातील राजगृह, वडाळा परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय या ठिकाणांना भेट देणाऱ्या अनुयायांसाठी देखील सकाळी ८ ते रात्री ९ वाजेपर्यंत वीर कोतवाल उद्यान (प्लाझा) आणि वडाळा आगारा दरम्यान विशेष बसच्या फेऱ्या सोडण्यात येणार आहेत.

ठिकाणी विशेष बसफेऱ्यांची तिकीटे…
स्थळदर्शन बसफेऱ्यांची तिकीटे चैत्यभूमी, शिवाजी पार्क बसचौकी आणि वीर कोतवाल उद्यान प्लाझा येथे उपलब्ध करण्यात येतील.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments