Placeholder canvas
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रपश्चिम महाराष्‍ट्रपुण्यात आयपीएल सामन्यांसाठी पाणी आणणार कोठून?-उच्च न्यायालय

पुण्यात आयपीएल सामन्यांसाठी पाणी आणणार कोठून?-उच्च न्यायालय

pune steduim, bombay high court

मुंबई – पुण्यात होणाऱ्या आयपीएलच्या सामान्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याच्या विरोधात लोकसत्ता या सेवाभावी संस्थेतर्फे मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर शुक्रवारी न्यायालयात सुनावणी झाली.

कावेरी पाण्याच्या मुद्द्यावरून चेन्नई सुपर किंगच्या होम ग्राऊंडवर आंदोलन करण्यात आले होते. हा विषय पाहता कावेरी पाणी वाटपाच्या मुद्द्यावर झालेल्या आंदोलनानंतर चेन्नई मधील सामने पुण्यात खेळविले जाणार आहेत. याला अनुसरून मुंबई उच्च न्यायालयाने आज महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनला न्यालायत काही प्रश्नांची उत्तरे मागितली. ज्यात पुण्यातील मैदानावर क्रिकेटचे किती सामने होणार आहेत ? यासाठी मैदान मेंटेन करण्यासाठी किती पाणी लागणार असून त्या पाण्याची व्यवस्था कुठून केली जाणार आहे ? या बद्दलची माहिती न्यायालयात सादर करावी लागणार आहे.
पुण्याला होणारा पाणीपुरवठा हा पवना नदीद्वारे केला जात आहे. पुण्याला पाण्याची झळ बसली असताना पुण्यातील मैदानांवर होणाऱ्या आयपीएल सामन्यांसाठी मोठ्या प्रमाणावर पाण्याची गरज भासणार आहे, असा मुद्दा याचिकाकर्त्यांनी न्यायालयात उपस्थित केला. आयपीएल २०१६ च्या मोसमात हीच याचिका मुंबईत होणाऱ्या सामन्यांच्या संदर्भात दाखल करण्यात आली होती. ज्यात मुंबईतील सामने मुंबई बाहेर खेळविण्याची मागणी करण्यात आली होती. यात आता पुण्यातील सामन्याचा समावेशबद्दल आज सुनावणी घेण्यात आली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments