Placeholder canvas
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईसोनिया गांधींनी लीलावती रुग्णालयात पतंगराव कदमांची घेतली भेट!

सोनिया गांधींनी लीलावती रुग्णालयात पतंगराव कदमांची घेतली भेट!

Sonia Gandhi,Patangrao Kadamमुंबई – काँग्रेस पक्षाच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज लीलावती रुग्णालयात उपचार घेत असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांची भेट घेतली. तसेच त्यांच्या प्रकृतीची चौकशी देखील केली.

कदम यांना शनिवारी मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून कदम यांच्यावर उपचार सुरू आहेत. किडनीच्या विकाराने ग्रस्त असलेल्या कदम यांच्या प्रकृतीवर डॉक्टरांची एक टीम लक्ष ठेवून आहे. मुंबईमध्ये ९ आणि १० मार्च रोजी होणाऱ्या १७ व्या इंडिया टुडे कॉन्क्लेवमध्ये सोनिया गांधी या सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमासाठी शुक्रवारी मुंबईच्या दौऱ्यावर आलेल्या सोनिया गांधी यांनी पतंगराव कदम यांची लीलावती रुग्णालयात जाऊन भेट घेतली. तसेच त्यांच्या तब्येतीची विचारपूस देखील केली. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण त्यांच्यासोबत होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments