Placeholder canvas
Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईशरद पवारांनी इलेक्ट्रॉनीक माध्यमांच्या प्रतिनिधींना झापले

शरद पवारांनी इलेक्ट्रॉनीक माध्यमांच्या प्रतिनिधींना झापले

Sharad pawar NCP's Test for establishing powerमुंबई: काँग्रेस-राष्ट्रवादी समन्वय समितीच्या बैठकीपूर्वीच काही तरी बिनसल्याने राष्ट्रवादीचे विधिमंडळ गटनेते अजित पवार प्रचंड वैतागले आहेत. अशा खोट्या बातम्या पसरवणा-या इलेक्ट्रॉनिक मिडियाच्या प्रतिनिधींना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी चांगलेच झापले. चुकीच्या बातम्या देत असाल तर उद्या पासून येथे येऊ नका असे हात झोडून सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटल्यानंतर ते तडकाफडकी बारामतीच्या दिशेने निघाले. समन्वय समितीची बैठकही रद्द झाली. अशा प्रकाराच्या बातम्या दाखवण्यात आल्या. मात्र, शरद पवार खूपच संतापले होते. त्यांच्या निवासास्थानी जमलेल्या इलेक्ट्रॉनिक मिडियाच्या प्रतिनिधींसमोर पवार आले सांगितले. तुम्हाला काही सांगितल्यानंतर तुमच्या पाच दहा गाड्या पाठिमागे असतात. त्यामुळे तुम्हाला अजित पवारांनी सांगितलं नाही. तुम्ही आता काय बातम्या दाखवता मी बघतो. असेही सुनावले.

तुम्ही खोट्या बातम्या दाखवत असाल तर मी उद्या पासून काहीही बोलणार नाही तुम्ही इथं येऊ नका असं हात जोडून पवारांनी पत्रकारांना सांगितलं. त्यावेळी सर्वच पत्रकारांनी नाही.. नाही.. करत सॉरी.. सॉरी केलं. आणि पवार त्यांच्या निवासस्थानात निघून गेले.

आव्हाडांनीही केली नाराजी व्यक्त…

आमदार जितेंद्र आव्हाडांनीही माध्यमांवर नाराजी व्यक्त केली. सर्वच गोष्टी उघड करुन सांगता येत नाही. एवढ्या मोठ्या राज्याच्या घडामोडी घडतं आहे काही पथ्य पाळावे लागतात काही गोष्टी गुपीत ठेवाव्या लागतातं असंही आव्हाडांनी माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितलं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments