Placeholder canvas
Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईचेंबूरच्या पोलीस अधिका-याचा रशियन महिलेवर बलात्कार

चेंबूरच्या पोलीस अधिका-याचा रशियन महिलेवर बलात्कार

मुंबई : दहा वर्षापूर्वी पवई पोलिस ठाण्यातील पोलीस अधिका-याविरूध्द बलात्काराचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर आता चेंबूर पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिका-या विरुध्द बलात्काराची तक्रार रशियन नागरिक असलेल्या महिलेने दिली आहे. यामुळे पोलिसदलात एकच खळबळ उडाली आहे.

एका रशियन नागरिक असलेल्या महिलेने तिच्यावर एका पोलीस अधिकाऱ्याने बलात्कार  केल्याची तक्रार दिली आहे. या प्रकरणी पोलीस अधिकारी अनिल जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. चेंबूरमधील आरोपी पोलीस अधिकाऱ्याने मागील 12 वर्ष अत्याचार करत वारंवार गर्भपात केल्याचा आरोपही पीडित महिलेने केला आहे.

व्हिजा वाढवून देण्याच्या निमित्ताने 2003 मध्ये आरोपी पोलीस अधिकारी अनिल जाधवशी ओळख झाल्याचं पीडितेने म्हटलं आहे. आरोपीने ओळख झाल्यानंतर गुंगीचं औषध देऊन वारंवार बलात्कार केला. माझ्या मुलाला आणि मला जीवे मारण्याचा प्रयत्न देखील केला, असाही आरोप पीडित महिलेने केला आहे.

बहिण भावाचा खून केल्याचा आरोप

आरोपी पोलीस अधिकारी जाधवने एका तरुणीचा आणि तिच्या भावाचा खून आपल्या समक्ष केला. त्यानंतर त्याने त्या बहिण भावाचे मृतदेह पुण्यात एका ठिकाणी गाडले आहेत, असा खळबळजनक खुलासा पीडितेने केला आहे. आरोपी पोलीस अधिकाऱ्यावर कडक कारवाईची मागणी केली. आरोपी पोलीस अधिकारी अनिल जाधव यांची पत्नी एका पक्षाची पदाधिकारी आहे. या प्रकरणाकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहे.

पवईमध्ये पोलीस अधिकारी अरुण बोरुडेंची बलात्कारनंतर आत्महत्या

दहा वर्षापूर्वी पवई पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी अरुण बोरुडे यांनी व त्यांच्या सहका-यांनी 15 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला होता. त्यानंतर त्या मु्लीने एका मुलाला जन्म दिला होता. त्यामुळे ही घटना उघडकीस आल्यानंतर बोरूडे व सहका-यांविरूध्द बलात्काराची तक्रार दाखल करण्यात आली होती. बोरूडे तक्रार दाखल केल्यानंतर फरार झाला होता. बोरुडेची पोलिसांनी फरार घोषित केल्यानंतर त्याने अहमदनगर भागात रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments