Placeholder canvas
Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईसतीश शेट्टी हत्या प्रकरणी वीरेंद्र म्हैसकर यांना क्लीन चिट

सतीश शेट्टी हत्या प्रकरणी वीरेंद्र म्हैसकर यांना क्लीन चिट

Virendra Mhaiskaमुंबई: सर्वत्र गाजलेल्या माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी खून प्रकरणाचा क्लोजर रिपोर्ट केंद्रीय अन्वेषण विभागाने पुणे जिल्हा सत्र न्यायालयात सादर केला आहे. या प्रकारणातील आरोपी आणि तेव्हाचे आयआरबीचे कार्यकारी संचालक वीरेंद्र म्हैसकर यांना क्लीन चिट दिली.  

आतापर्यंत दाखल करण्यात आलेल्या अंतिम अहवालात कोणताही नवीन पुरावा मिळालेला नसल्याने या प्रकारणातील आयआरबी कंपनीचे प्रमुख वीरेंद्र म्हैसकर यांना क्लीन चिट दिली आहे. या पार्श्वभूमीवर सतीश शेट्टीच्या हत्येप्रकरणी सीबीआयने प्रकरण बंद करण्याचे जाहीर केले. माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी यांची १३ जानेवारी २०१० रोजी तळेगाव येथे राहत्या घराजवळ अज्ञात हल्लेखरांनी धारदार शस्त्रांनी वार करून हत्या केली होती. या घटनेने पुणे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सीबीआयकडे देण्यात आला होता.

तेव्हाचे आयआरबीचे कार्यकारी संचालक वीरेंद्र म्हैसकर हे सतीश शेट्टी हत्या प्रकरणातील आरोपी म्हणून त्यांच्यावर न्यायालयात खटला सुरु होता. पण आता सीबीआयने त्यांना निर्दोष जाहीर केले आहे. यापूर्वी, याप्रकरणात तपासात दिरंगाई केल्याचा आरोप तत्कालीन पोलीस निरीक्षक भाऊसाहेब आंधळकर यांच्यावर शेट्टी यांच्या कुटुंबियांनी केला होता. याप्रकरणी त्यांना काही महिन्यांसाठी तुरुंगवासही झाला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments