Placeholder canvas
Monday, May 6, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईडोंगरी विकास कार्यक्रमासाठी ३१ कोटी रुपयांचा निधी वितरित - सुधीर मुनगंटीवार

डोंगरी विकास कार्यक्रमासाठी ३१ कोटी रुपयांचा निधी वितरित – सुधीर मुनगंटीवार

डोंगरी विभाग विकास कार्यक्रमांतर्गत एप्रिल ते जुलै २०१९ या चार महिन्यातील खर्च भागविण्यासाठी ३१ कोटी ३५ लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आल्याची माहिती वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

यासंबंधीचा शासन निर्णय नियोजन विभागाने निर्गमित केला असल्याची माहिती देऊन ते म्हणाले, डोंगरी भागाच्या विकासासाठी सन २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी ९५ कोटी  रुपयांचा निधी अर्थसंकल्पित करण्यात आला आहे. त्यातून चार महिन्यांच्या खर्चासाठी हा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, औरंगाबाद, बीड, नांदेड, हिंगोली, नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर, नंदूरबार, अमरावती, अकोला, बुलढाणा आणि यवतमाळ जिल्ह्यातील डोंगरी भागाच्या विकासाला  यातून चालना मिळणार असल्याचेही श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.

हा निधी घालून दिलेल्या अटी आणि शर्तीच्या अधीन राहून खर्च करता येईल.

आज दि. १२ जून २०१९ रोजी नियोजन विभागाने निर्गमित केलेल्या शासन निर्णयाचा सांकेतांक  २०१९०६१२१२४६२६९४१६ असा आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments