Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईराहुल गांधी हे माझे नेते आहेत आणि कायम राहतील - संजय निरूपम

राहुल गांधी हे माझे नेते आहेत आणि कायम राहतील – संजय निरूपम

Sanjay Nirupamमुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरूपम म्हणाले, “राहुल गांधी यांच्या रॅलीतील माझ्या अनुपस्थितीबद्दल चर्चा अर्थहीन आहेत. अत्यंत महत्त्वाच्या कौटुंबिक कार्यक्रमामुळे मी संपूर्ण दिवस व्यस्त होतो. यासंदर्भात मी राहुल गांधी यांना आधीच माहिती दिली होती. राहुल गांधी हे माझे नेते आहेत आणि कायम राहतील,” असे त्यांनी ट्विट करून स्पष्ट केलं.

राहुल गांधी प्रचारासाठी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते. राहुल गांधी यांच्या मुंबईतील रॅलीला मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम अनुपस्थित होते. त्यामुळे त्यांच्यावर पक्षातून टीका सुरू झाली होती. निरुपम यांना त्यांच्या पक्षांतर्गत विरोधकांनी टार्गेट केले. या प्रकारामुळे संतापलेल्या निरुपम यांनी आपण मुंबईतील त्या रॅलीला का उपस्थित नव्हतो याचे स्पष्टीकरण दिले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments