Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईविधानसभा अध्यक्षांवरचा विश्वासदर्शक ठराव आवाजी मतदानाने मंजूर!

विधानसभा अध्यक्षांवरचा विश्वासदर्शक ठराव आवाजी मतदानाने मंजूर!

मुंबई : विरोधकांना गाफील ठेवत विधानसभा अध्यक्षांना आपल्या पदावर कायम ठेवण्यासाठी सरकारने विश्वासदर्शक ठराव आज आवाजी मतदानाने मंजूर केला. विरोधकांनी गेल्या आठवड्यात अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या विरोधात अविश्वास ठरावाची नोटीस दिली होती. मात्र विरोधकांना गाफील ठेवत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अध्यक्ष बागडे यांना अध्यक्षपदी कायम ठेवण्याचा प्रस्ताव मांडला.लगेच शिवसेनेचे गट नेते एकनाथ शिंदे यांनी त्या प्रस्तावाला अनुमोदन दिले.

विरोधकांनी त्यानंतर गोंधळ घालण्यास सुरुवात केली. मात्र  तालिका अध्यक्ष  सुधाकर देशमुख यांनी विरोधकांकडे दुर्लक्ष करत आवाजी मतदानाने प्रस्ताव मंजूर केला. विरोधकांच्या प्रस्तावावर सभागृहात चर्चा होऊन मतदान घ्यावे, अशी विरोधकांची इच्छा होती, मात्र अतिशय चपळाईने सरकारने या बाबतची रणनीती आखल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान विरोधकांच्या प्रस्तावावर कुरघोडी करत सरकारने आवाजी मतदानाने प्रस्ताव मंजूर लोकशाहीची पायमल्ली केल्याचा आरोप विरोधकांनी केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments