Placeholder canvas
Tuesday, May 7, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईकाँग्रेसने कुत्र्यांकडून देशभक्ती शिकावी- मोदी

काँग्रेसने कुत्र्यांकडून देशभक्ती शिकावी- मोदी

मुंबई: काँग्रेसने किमान कुत्र्यांकडून देशभक्ती शिकावी, अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी कर्नाटकच्या जामखंडी येथे काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. उत्तर कर्नाटकात आढळणा-या मुधोल कुत्र्यांकडून काँग्रेसने देशभक्ती शिकावी असा सल्ला मोदींनी दिला.

उत्तर कर्नाटकमध्ये आढळणा-या मुधोल कुत्र्यांचा नुकताच भारतीय लष्करामध्ये समावेश करण्यात आला आहे. मुधोल कुत्रे म्हणजे शिकारी कुत्र्यांची एक जात आहे. भारतीय लष्करामध्ये सामील होणारी मुधोल ही भारतीय कुत्र्यांची पहिली प्रजाती आहे.

उत्तर कर्नाटकच्या जामखंडी येथील बागलकोटमध्ये एका निवडणूक प्रचारसभेत मोदी बोलत होते. ”ज्यांना देशभक्तीच्या नावाने त्रास होतो, देशभक्तीच्या चर्चेविरोधात आहेत किंवा ज्यांना देशभक्ती आवडत नाही, अशा सगळ्यांना मी सांगू इच्छितो की, तुम्हाला दुसऱ्याकडून शिकायचं नाही तर नका शिकू. मग ते तुमचे पूर्वज असो किंवा काँग्रेस. मात्र, बागलकोटच्या मुधोल कुत्र्यांकडून तरी शिकण्याचा प्रयत्न करा”. मोदी पुढे म्हणाले, ”मला माहित आहे की (काँग्रेस) ला खूप अहंकार आहे. देशातील लोकांनी त्यांना नाकारलंय. त्यामुळे मुधोल कुत्र्यांकडूनही ते काही शिकतील अशीही मला अपेक्षा नाही”.

काँग्रेसचा दर्जा इतका खालावला आहे की, पक्षाचा एक नेता ‘भारत के टुकडे होंगे’ अशी नारेबाजी करणा-यांमध्ये गेला आणि त्यांना समर्थन दिलं असं मोदी म्हणाले. जेएनयूमधील देशविरोधी नारेबाजीच्या प्रकरणानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी जेएनयूच्या परिसरात गेले होते, त्यावरुन मोदींनी राहुल यांना हे खडेबोल सुनावले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments