Placeholder canvas
Wednesday, May 1, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईभाजपा पदाधिकाऱ्याकडून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान!

भाजपा पदाधिकाऱ्याकडून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान!

Dr Babasaheb Ambedkarमीरारोड :  मीरा रोड मध्ये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमीत्त बॅनर लावण्यात आला होता. गुन्हे दाखल असलेल्या पदाधिकाऱ्यांनी बॅनरवर स्वत:चे फोटो डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याच बाजूला छापून बाबासाहेबांचा अपमान केला. असा आरोप एक विचार मंचच्या वतीने करण्यात आला होता. या पूर्वी भाजपाच्या पदाधिकाऱ्याने अहमदनगरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला होता. आता बाबा साहेबांचा अपमान करण्यात आला.

१४ एप्रिल रोजीच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्त शुभेच्छा देणारा लांब आकाराचा बॅनर भाजपाच्या वतीने मीरारोडच्या सिल्वर पार्क जंक्शन वर लावला होता. बॅनरवर बाबासाहेबांचे छायाचित्र हे पंतप्रधान पासून भाजपाचे वादग्रस्त व गुन्हे दाखल असलेल्या पदाधिकारी यांच्या सह एकाच रांगेत टाकण्यात आले. या विरोधात एक विचार मंच च्या वतीने मीरारोड पोलीस ठाण्याचे निरीक्षक वसंत लब्दे यांना निवेदन दिले. भाजपाचे स्थानिक नेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांचे वादग्रस्त नेते व पदाधिकारी यांच्या सोबत एकाच रांगेत ठेऊन त्यांना कमी लेखून त्यांचा अपमान करत आहेत. अपमान करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी या वेळी करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी समज दिल्यावर भाजपा नगरसेवक अरविंद शेट्टी यांनी सदरचा फलक काढून टाकला. मात्र या घटनेचे तीव्र पडसाद परिसरात उमटले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments