Placeholder canvas
Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईकाँग्रेस नेत्यांशी पाच वाजता चर्चेनंतर पुढचा निर्णय : नवाब मलिक

काँग्रेस नेत्यांशी पाच वाजता चर्चेनंतर पुढचा निर्णय : नवाब मलिक

Nawab-Malik-on Devendra Fadnavis,Nawab malik,Devendra fadnavis,Pune Floods,Pune Rains,NCP,Malikमुंबई : महाराष्ट्राला स्थिर सरकार देण्यासाठी तीन पक्ष एकत्र आल्याशिवाय कोणीही सरकार स्थापन करू शकत नाहीत. काँग्रेसचे दिल्लीतील नेते मुंबईत आज येणार आहेत. त्यांच्याशी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार चर्चा करतील व त्यानंतर पुढचा निर्णय घेऊ. अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष आमदार नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

मलिक यांनी सांगितले की, आज वाय.बी. चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या 54 आमदारांची बैठक झाली. शरद पवार एका समितीशी स्थापना करणार आहेत. तसेच काँग्रेसचे राष्ट्रीयनेते अहमद पटेल, के.सी.वेणूगोपाल हे दिल्लीहून आज संध्याकाळी मुंबईत दाखल होणार आहेत. त्यानंतर या नेत्यांची शरद पवारांसोबत एक बैठक होणार होईल व त्यानंतर सर्व काही ठरवलं जाईल. अशीही माहिती मलिक यांनी दिली.

राष्ट्रपती राजवटीबाबत कोणताही आदेश नाही…

राष्ट्रपती राजवटी बाबत राजभवनातून स्पष्ट करण्यात आले की, असा कोणताही निर्णय घेण्यात आलं नाही. आम्हाला रात्री साडेआठ वाजेपर्यंतची वेळ देण्यात आली आहे. असेही मलिक यांनी स्पष्ट केलं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments