Placeholder canvas
Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईप्रताप सरनाईकांवरील कारवाईवर शरद पवार, म्हणाले…

प्रताप सरनाईकांवरील कारवाईवर शरद पवार, म्हणाले…

मुंबई l शिवेसना आमदार प्रताप सरनाईक Pratap Sarnaik यांच्यावर ईडीकडून कारवाई करण्यात आली. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार Sharad pawar यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्रात पुन्हा सत्ता मिळत नाही म्हणून ईडीची कारवाई करण्यात आली असल्याचंही ते म्हणाले आहेत.

लोकांच्या प्रश्नाची उत्तरं देण्याऐवजी राजकीय विरोधकांविरोधात सरकारी तपास यंत्रणांचा वापर केला जात असल्याची टीका शरद पवारांनी केली आहे. महाराष्ट्रात पुन्हा सत्ता मिळत नाही म्हणून ईडीची कारवाई करण्यात आली असल्याचंही ते म्हणाले आहेत.

हेही वाचा l Love Jihad l ‘लव्ह जिहाद’वरुन योगी सरकारला दणका

बीड जिल्ह्यातील भाजपाचे माजी खासदार आणि माजी मंत्री जयसिंग गायकवाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

राज्यात जे सध्या सुरु आहे ते विरोधकांच्या नैराश्याचं प्रतिक आहे. लोकांच्या प्रश्नांची उत्तरं देण्याऐवजी राजकीय विरोधकांविरोधात सरकारी तपास यंत्रणांचा वापर केला जात आहे. हे योग्य नाही.

आमच्या महाविकास आघाडी सरकारने एक वर्ष पूर्ण केलं असून आता आपण पुन्हा सत्तेत येणार नाही हे त्यांनी माहिती आहे. यामुळेच केंद्रात असणाऱ्या सत्तेचा गैरवापर केला जात आहे,” अशी टीका शरद पवारांनी केली आहे.

हेही वाचा l “सुरुवात तुम्ही केली, शेवट आम्ही करु”संजय राऊतांचा भाजपला इशारा

“महाराष्ट्र वेगळ्या पद्धतीने चालवण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी केला. लोकांची बांधिलकी ठेवण्याचे काम सरकार करत असून राज्यातील प्रत्येक घटकाला आपल्यासोबत घेत काम करत आहे,” असंही शरद पवार यांनी म्हटलं. राज्यात आज जे सरकार आहे त्याला सर्वसामान्यांचा पाठिंबा असल्याचंही ते म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments