Placeholder canvas
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईभाजपातून माझी हकालपट्टी झाली; राष्ट्रवादीने मला फोडले नाही : धनंजय मुंडे

भाजपातून माझी हकालपट्टी झाली; राष्ट्रवादीने मला फोडले नाही : धनंजय मुंडे

मुंबई: राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी मुंडे यांचे घर फोडले, असा आरोप शिवसेना नेते जयदत्त अण्णा क्षीरसागर यांनी केला होता. त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी उत्तर दिले आहे. शरद पवारांनी आमचे घर फोडले नसून भाजपनी मला पक्षातून बाहेर काढले; असे म्हणत मुंडे यांनी क्षीरसागरांचा आरोपाचे खंडन माध्यमांशी बोलताना केले.

धनंजय मुंडे म्हणाले की, 12 जानेवारी 2012 ला भगवान बाबांच्या जयंतीच्या दिवशी गोपीनाथ मुंडेंनी आपल्या भावाशी असलेलं रक्ताचं नातं तोडलं. आणि त्यानंतर भाजपच्या एका कार्यक्रमात त्यांनी पक्षातून काढून टाकल्याचं जाहीर केलं. त्यामुळे शरद पवारांनी आम्हला फोडलं नसून भाजपनेच आम्हाला पक्षातून काढून टाकले, असे मुंडे म्हणाले.

राजकीय फडावरून भाषण करताना क्षीरसागर यांच्या कडून मुंडेंच्या घराबाबत वारंवार भाष्य केले जाते. राष्ट्रवादी कॉंग्रेसनेचं मुंडेंचे घर फोडले आहे, असा आरोप क्षीरसागरांकडून वारंवार केला जातो. तसेच इतर नेतेही पवारांवर टीका करताना आरोप लावतात. मात्र धनंजय मुंडे यांनी वारंवार पवारांवरील आरोप खोडून काढले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments