Placeholder canvas
Sunday, April 28, 2024
Homeमनोरंजननवाजुद्दीन सिद्दीकीने,उद्धव ठाकरेंकडून जाणून घेतले बाळासाहेबांबाबत बारकावे!

नवाजुद्दीन सिद्दीकीने,उद्धव ठाकरेंकडून जाणून घेतले बाळासाहेबांबाबत बारकावे!

navazuddin siddiqui,udhav Thakaray,shiv sena२३ जानेवारी २०१९ रोजी ठाकरेहा सिनेमा रिलीज होणार आहे. अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीच्यावेळी त्याने शिवसेना पक्षप्रमुख ठाकरे यांच्याकडून शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब यांच्या बद्दल बारकावे जाणून घेतले. यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत सुद्धा उपस्थित होते. उद्धव आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्यात जवळपास दोन तास चर्चा झाली.

नवाजुद्दीन सिद्दीकी हा ‘ठाकरे’ या आगामी सिनेमात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका साकारणार आहे.या सिनेमात बाळासाहेबांची भूमिका साकारणं नवाजुद्दीनसाठी मोठं आव्हान असणार आहे.मात्र सिनेमाच्या टीझरमध्ये नवाजुद्दीनने दाखवलेली बाळासाहेबांची झलक सा-यांसाठी कौतुकाचा विषय ठरली होती.असं असलं तरी बाळासाहेबांची भूमिका साकारणं हे काही सोपं काम नाही हे खुद्द नवाजुद्दीनलाही माहिती आहे. कारण महाराष्ट्राच्या राजकारण आणि समाजकारणात बाळासाहेबांचे मोठे योगदान आहे.त्यामुळेच बाळासाहेबांच्या व्यक्तीमत्त्वाविषयी त्याने उद्धव यांच्याकडून या भेटीत बारकावे जाणून घेतले. २३ जानेवारी २०१९ रोजी ‘ठाकरे’ हा सिनेमा रिलीज होणार आहे. संजय राऊत सिनेमाची निर्मिती करत असून अभिजीत पानसे दिग्दर्शन करणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments