Placeholder canvas
Monday, May 6, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईस्वच्छ सर्वेक्षणात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या नगरपालिकांचा गौरव स्वच्छ सर्वेक्षण 2020 मध्ये सर्वोत्तम...

स्वच्छ सर्वेक्षणात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या नगरपालिकांचा गौरव स्वच्छ सर्वेक्षण 2020 मध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या शहरांना 500 कोटींची पारितोषिके देणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : लोकसहभाग व सवयी बदलल्यामुळे स्वच्छ सर्वेक्षणामध्ये परिवर्तन घडले आणि महाराष्ट्राने देशात सर्वाधिक पुरस्कार मिळविले आहेत. सन 2020 च्या स्वच्छ सर्वेक्षणात राज्यातील 200 शहरे ‘थ्री स्टार’ करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. तसेच जी शहरे थ्री स्टार होतील, त्या शहरांना विविध योजनासाठी निधी वितरणात प्राधान्य देण्यात येईल. तसेच सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या शहरांना 500 कोटी रुपयांची पारितोषिके देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली.

स्वच्छ सर्वेक्षण 2018 व 2019 मध्ये देशपातळीवर सर्वोत्तम कामगिरी केलेल्या महानगरपालिका व नगरपालिकांचा गौरव समारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज एनसीपीएच्या सभागृहात झाला. त्यावेळी श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार, वित्त व नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर, नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, नगर प्रशासन संचालक एम शंकरनारायण आदी यावेळी उपस्थित होते. सन 2018 व 2019च्या स्वच्छ सर्वेक्षणमध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या राज्यातील 39 स्थानिक स्वराज्य संस्थांचा गौरव यावेळी करण्यात आला. नगरपालिकांचे नगराध्यक्ष, मुख्याधिकारी यांनी हा गौरव स्विकारला.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान सुरू केले. महाराष्ट्राने यात पुढाकार घेऊन नागरी भागात सर्व नगरपालिकांना सोबत घेऊन स्वच्छतेची ही मोहिम सुरू केली. रेकॉर्डब्रेक काळात नागरी भाग हागणदारीमुक्त केला. 2017 मध्ये संपूर्ण महाराष्ट्र हागणदारीमुक्त झाल्याचे राष्ट्रपती महोदयांनी जाहीर केले. राज्याने स्वच्छतेबरोबरच घनकचरा व्यवस्थापन आणि सांडपाणी व्यवस्थापन यावर भर दिला. घनकचरा व्यवस्थापनमध्ये हरित कंपोस्ट खत हा ब्रँड तयार केला. वेस्ट पासून वेल्थची सुरुवात नागरपालिकांनी केली. 2014 पूर्वी एकही शहर हागणदारीमुक्त नव्हते. मात्र गेल्या चार वर्षात सर्व शहरे हागणदारीमुक्त झाली आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments