Placeholder canvas
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईउष्णतेच्या झळांनी मुंबई होरपळली!

उष्णतेच्या झळांनी मुंबई होरपळली!

मुंबई: जगातील आठवे उष्ण शहर ठरलेल्या मुंबईत देशातील सर्वाधिक ४१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मुंबईत या हंगामातील हे सर्वाधिक तापमान होते. राज्यातील इतर अनेक शहरांतील नागरिकही वाढत्या उन्हामुळे हैरण होते. उष्णतेच्या झळांनी  मुंबई अक्षरश: होरपळली.

मुंबईत १७ मार्च २०११ मध्ये ४१.३ तर २६ मार्च २०१५ मध्ये ४०.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. त्या व्यतिरिक्त एकदाही मार्च महिन्यात पाऱ्याने ३९ अंशांचा टप्पा पार केला नव्हता. मुंबईचे मार्चमधील आतापर्यंतचे सर्वाधिक ४१.७ अंश सेल्सिअस तापमान २८ मार्च १९५६ मध्ये नोंदले गेले आहे. विदर्भातील बहुतांश भागाचा पारा रविवारी चढला. विदर्भात २ ते ३ तर कोकणात ३ ते ६ अंश सेल्सिअसने तापमान वाढले. अकोला जगातील चौदावे उष्ण शहर ठरले. तेथे ४०.५ अंशाची नोंद झाली. पूर्वेकडून मुंबईसह महाराष्ट्राकडे वाहत असलेल्या उष्ण वाऱ्यामुळे तापमान वाढले आहे.कमाल तापमानात पाच ते सहा अंशांची वाढ होईल, असा अंदाज शनिवारीच वर्तविण्यात आला होता. रविवार आणि सोमवार या दोन्ही दिवशी नागरिक उष्णतेमुळे हैराण झालेले दिसून येत आहे.

निंबु सरबत,कोल्ड्रींक्सवर दुकानांवर गर्दी

उष्णतेमुळे जागोजागी नागरिक निंबु सरबत,कोल्ड्रींक्स पितांना दिसत आहेत. जीवाची लाई लाई होत असल्यामुळे कामाच्या धावपळीत जास्तच त्रास वाढला असल्याचे दिसत आहेत. यासाठी निंबु सरबत पिण्यासाठी जागोजागी गर्दी दिसून येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments