Friday, December 6, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईसावधान: मुंबईत एका रेस्तराँमधील १० कर्मचारी निघाले कोरोना पॉझिटिव्ह

सावधान: मुंबईत एका रेस्तराँमधील १० कर्मचारी निघाले कोरोना पॉझिटिव्ह

mumbai-coronavirus-radhakrushna-restaurant-reports-ten-positive-covid19-case
mumbai-coronavirus-radhakrushna-restaurant-reports-ten-positive-covid19-case

मुंबई: मुंबईसह राज्यात कोरोनाचा कहर सुरुच आहे. अंधेरीतील राधाकृष्ण रेस्तराँमधील १० कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. या रेस्टॉरंटमध्ये ३५ कर्मचारी कार्यरत आहेत. कोरोना पॉझिटिव्ह निघालेल्या कर्मचाऱ्यांना बीकेसीतील जम्बो कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं असून, इतरांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. त्यामुळे रेस्टॉरंट दोन दिवसांसाठी बंद करण्यात आलं आहे.

मागील काही दिवसांपासून राज्यातील करोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. दररोज ७ ते ९ हजारांच्या दरम्यान रुग्ण आढळून येत असून, मुंबईतील दररोजची रुग्णासंख्याही १ हजार पेक्षा जास्तच आहे. सरकारकडून खबरदारी घेण्याचं आवाहन केलं जात असतानाच मुंबईतील प्रसिद्ध राधाकृष्ण रेस्टॉरंटमधील १० कर्मचारी करोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. त्यांना बीकेसी येथील जम्बो कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

मागील काही दिवसांपासून राज्यातील करोना रुग्णसंख्या वाढीचा वेग कमालीचा वाढला आहे. करोनाचा संक्रमण दर कमी झाल्यानंतर राज्यात दिवसाला २ ते ३ हजाराच्या सरासरीनं रुग्ण आढळून येत होते. मुंबईतील रुग्णांचं प्रमाण घटलं होतं. मात्र, मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागली आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात असून, मुंबईतही करोनाचा प्रसार वाढला आहे. दरम्यान मुंबईतील प्रसिद्ध राधाकृष्ण रेस्टॉरंटमधील १० कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.

मुंबई आणि महाराष्ट्रावरील करोनाचं संकट कायम आहे. मागील काही दिवसांपासून राज्यातील करोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. दररोज ७ ते ९ हजारांच्या दरम्यान रुग्ण आढळून येत असून, मुंबईतील दररोजची रुग्णासंख्याही १ हजार पेक्षा जास्तच आहे. सरकारकडून खबरदारी घेण्याचं आवाहन केलं जात असतानाच मुंबईतील प्रसिद्ध रेस्तराँमधील १० कर्मचारी करोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. त्यांना बीकेसी येथील जम्बो कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

मागील काही दिवसांपासून राज्यातील करोना रुग्णसंख्या वाढीचा वेग कमालीचा वाढला आहे. करोनाचा संक्रमण दर कमी झाल्यानंतर राज्यात दिवसाला २ ते ३ हजाराच्या सरासरीनं रुग्ण आढळून येत होते. मुंबईतील रुग्णांचं प्रमाण घटलं होतं. मात्र, मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागली आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात असून, मुंबईतही करोनाचा प्रसार वाढला आहे. दरम्यान मुंबईतील प्रसिद्ध राधाकृष्ण रेस्टॉरंटमधील १० कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.

बृहन्मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, अंधेरीतील राधाकृष्ण रेस्तराँमधील १० कर्मचारी करोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. या रेस्टॉरंटमध्ये ३५ कर्मचारी कार्यरत आहेत. करोना पॉझिटिव्ह निघालेल्या कर्मचाऱ्यांना बीकेसीतील जम्बो कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं असून, इतरांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. त्यामुळे रेस्टॉरंट दोन दिवसांसाठी बंद करण्यात आलं आहे. सॅनिटाइज केल्यानंतर आणि नवीन कर्मचारी आल्यानंतर पुन्हा सुरू करण्याची परवानगी दिली जाईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments