Placeholder canvas
Sunday, April 28, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईराज ठाकरे इच्छुक उमेदवार , पदाधिका-यांना देणार कानमंत्र !

राज ठाकरे इच्छुक उमेदवार , पदाधिका-यांना देणार कानमंत्र !


मुंबई : मनसेने विधानसभा निवडणुकीच्या रणांगणात उडी घेतली आहे. मनसेचे इच्छूक उमेदवार, राज्य सरचिटणीस, राज्य सचिव, राज्य उपाध्यक्ष, जिल्हाध्यक्षांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. सोमवारी सकाळी 10 वाजता, एम.आय. जी क्लब ,वांद्रे, मुंबई येथे हा मेळावा होत आहे. राज ठाकरे सर्वांना कोणता कानमंत्र देतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

ईडीच्या चौकशीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे शांत झाले होते. मनसे विधानसभा निवडणुका लढणार की नाही या बाबत तर्कवितर्क लावले जात होते. मात्र, मनसे विधानसभेच्या आखाड्यात उतरणार असून जवळपास निश्चित झाले आहे. किती जागा लढवणार हे अधिकृतपणे जाहीर करण्यात आले नाही. मात्र, सोमवारी राज ठाकरे हे इच्छुक उमेदवारांना आणि पदाधिका-यांना मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी यावेळी इतर कुणालाही प्रवेश दिला जाणार नाही असे मनसेने जाहीर केले.

लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान राज ठाकरे यांनी भाजपा विरूध्द जोरदार प्रचार केला होता. नरेंद्र मोदी आणि अमित शाह ही दोन व्यक्ती राजकीय क्षेत्राच्या पटलावर दिसता कामा नये अशी भूमिका घेऊन भाजपा सरकारने पाच वर्षात देशाला कसे संकटात टाकले याचा पाढा वाचला होता. विशेष म्हणजे ‘लाव रे तो व्हिडीओ’ हे चांगलंच गाजलं होतं. भाजपाती नेत्यांनी विरोधात असताना आणि सत्तेत असताना काय वक्तव्य केले होते. सरकारने खोटी आश्वासने देऊन कशी फसवणून केली होती त्या सर्वांची व्हिडीओमधून पोलखोल केली होती. आता विधानसभेत राज ठाकरे कशा प्रकारे आक्रमक होतात याचीच उत्सुकता सर्वांना लागलेली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments