Placeholder canvas
Wednesday, May 8, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबई'मातोश्री' बाहेर झळकले मुख्यमंत्री आदित्य ठाकरेचे पोस्टर!

‘मातोश्री’ बाहेर झळकले मुख्यमंत्री आदित्य ठाकरेचे पोस्टर!

Aaditya Thackeray Posterमुंबई : शिवसेना भाजपामध्ये सत्तास्थापनेचा पेच कायम असताना शिवसेना कार्यकर्त्यांकडून ‘मातोश्री’ बाहेर आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होणार असल्याचे पोस्टर लावण्यात आले आहे. त्यामुळे शिवसेना भाजपासोबत जाणार नाही अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

‘साहेब आपण करून दाखवलं’ असंही पोस्टरमध्ये म्हटलंय. आज पहाटे हे पोस्टर लावण्यात आले. ‘माझा आमदार माझा मुख्यमंत्री’ असे पोस्टर ‘मातोश्री’बाहेर लावले आहे. दुसरीकडे शिवसेना नेते खासदार संजय राऊत आक्रमक झाले आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या मनात वेगळं काही तरी सुरु आहे. राऊत वारंवार शिवसेनेकडे 175 आमदार आहेत असे माध्यमांशी बोलताना दावा करत आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचाही उत्साह वाढला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments