मुंबई: युती, आघाडीनंतर मनसेच्या 27 शिलेदारांची यादी जाहीर करण्यात आली. माहिममधून संदीप देशपांडे, ठाण्यातून अविनाश जाधव,कल्याण पश्चिम प्रकाश भोईर, सिंदखेडयातून शेतकरी धर्मा पाटलांचे पुत्र नरेंद पाटलांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.
मनसेने विधानसभेच्या आखाड्यात उडी घेतली असून निवडणुकीत चुरस निर्माण होणार आहे. विशेष म्हणजे युतीमध्ये जागावाटपावरून गोंधळ निर्माण झालेला असतांना मनसे आणि काँग्रेस आघाडीच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे.