Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईकसाबची सुपारी? ही तर बकवास! - छोटा शकील

कसाबची सुपारी? ही तर बकवास! – छोटा शकील

राकेश मारियांचा दावा फेटाळून लावला

Chhota Shakeel,Rakesh Mariaमुंबई : २६/११च्या हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाबला मारण्याची सुपारी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमने दिली होती, असा खळबळजनक गौप्यस्फोट मुंबईचे माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी केला होता. दाऊदचा उजवा हात छोटा शकीलने मारिया यांचा हा दावा फेटाळून लावला आहे. कसाबला मारण्याची सुपारी दाऊदला मिळाली नव्हती. मारिया यांनी चुकीचा दावा केला आहे,अशी माहित छोटा शकीलने एका वृत्तवाहिनीशी बोलतांना दिली.

कसाबला मारण्याची सुपारी दाऊदला मिळाली होती. ही बकवास आहे. पुस्तकाचा खप व्हावा म्हणून हा दावा करण्यात आला आहे. कसाब किंवा अन्य कोणालाही मारण्याचा प्रश्नच येत नाही, असं सांगतानाच भारतात कोण खोटं बोलत नाही, सर्वच खोटं बोलत आहेत, असं छोटा शकीलने म्हटलं आहे.

मारियांच्या दाव्यात तथ्य नाही – सरकारी वकील उज्जवल निकम

सरकारी वकील उज्जवल निकम यांनीही मारिया यांच्या दाव्यात तथ्य नसल्याचं म्हटलं आहे. पाकिस्तानची गुप्तहेर संस्था आयएसआय आणि लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेने कसाबला मारण्याची सुपारी दिल्याचं कसाबच्या आरोपपत्रात कुठेही नमूद करण्यात आलेलं नव्हतं, असं निकम यांनी म्हटलं आहे. निकम हे सरकारी वकील असून त्यांनीच मुंबईवरील हल्ल्याच्या खटल्यात सरकारची बाजू मांडली होती.

‘लेट मी सेय इट नॉट’ आत्मचरित्र…

दरम्यान, यापूर्वी तत्कालीन मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी ‘लेट मी सेय इट नॉट’ या आत्मचरित्रात आयएसआय आणि लष्कर ए तोयबाने दाऊदला जीवे मारण्याची सुपारी दिली होती. त्यामुळे आम्ही कसाबची कोणतीही खबर बाहेर जाऊ नये म्हणून विशेष काळजी घेत होतो, असं म्हटलं होतं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments