Placeholder canvas
Monday, May 6, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईखडसेंना अडकवण्यासाठी भाजपच्याच नेत्यांनी सुपारी दिली

खडसेंना अडकवण्यासाठी भाजपच्याच नेत्यांनी सुपारी दिली

Khadse Inamdarमुंबई: भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांना अडकवण्यासाठी भाजपच्याच एका ज्येष्ठ मंत्र्यांनी सुपारी दिली होती. यासंदर्भात ३ वर्षांपूर्वी अंजली दमानिया यांच्या घरी बैठक झाली, असा खळबळजनक आरोप ज्येष्ठ कार्यकर्त्या कल्पना इनामदार यांनी केला आहे. मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

यावेळी कल्पना इनामदार यांनी दमानिया यांनी त्यांच्यावर केलेले आरोप फेटाळून लावले. मी उद्योजक आहे, माझ्या मिळकतीतून मी अण्णांच्या आंदोलनाचा खर्च केला आहे. तसेच हा संपूर्ण व्यवहार मी चेकने केला आहे. यात कोणत्याही भ्रष्टाचाराचा पैसा नाही. माझा सर्व आर्थिक व्यवहार आणि बँक स्टेटमेंट्स मी पोलिसांना द्यायला तयार आहे. पोलिसांनी याची चौकशी करावी. उलट अण्णांच्या आंदोलनाला भ्रष्टाचाराचा पैसा लागला आहे, असा आरोप करून दमानिया यांनी अण्णांचा अपमान केला, असे देखील इनामदार म्हणाल्या. छगन भुजबळ यांच्यासोबत मी कधीही काम केले नाही. भुजबळ यांची  चौकशी करताना ईडीने त्यांच्या नोकराला ही आरोपी केले. तर मग ईडीने  माझी चौकशी का केली नाही? दमानिया यांच्या विरोधात १ कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला असल्याचेही इनामदार यांनी सांगितले आहे. अंजली दमानिया यांच्या घरी १२ डिसेंबर २०१५ ला झालेल्या बैठकीत दमानिया यांचे पती अनिष दमानिया, बिल्डर राजेश खत्री आणि ललित टेकचंदानी यांची बैठक झाली होती. त्यावेळी मलाही एकनाथ खडसे यांना अडकवण्यासाठी गळ घालण्यात आली होती. मात्र, मी हे काम करण्यास नकार दिला होता. याची शहानिशा करण्यासाठी दमानिया यांच्या घरी आलेल्यांची नार्को टेस्ट करावी, अशी मागणी इनामदार यांनी केली आहे.
दमानिया यांनी माझ्यावर केलेले आरोपांची ३० दिवसात चौकशी करावी. अन्यथा, ३१ व्या दिवशी मी आझाद मैदानात उपोषणाला बसेल, असा इशारा ही इनामदार यांनी यावेळी दिला. दमानिया वेळोवेळी आपले विधान बदलत आहेत. त्यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करायला मी तयार आहे. तर, दमानिया यांनीही चौकशीला सामोरे जावे, असे आव्हान त्यांनी यावेळी दिले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments