Placeholder canvas
Monday, May 6, 2024
Homeमहाराष्ट्रजयंत पाटील - प्राजक्त तनपुरे मामा भाचे झाले मंत्री

जयंत पाटील – प्राजक्त तनपुरे मामा भाचे झाले मंत्री

Jayant Patil - Prajakt Tanpure, ncp ,maharshtra cabinet, maha cabinet, मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे महाआघाडी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असून मंत्रिपदाच्या विस्तारामध्ये त्यांचे भाचे राहुरी मतदारसंघाचे आमदार प्राजक्त तनपुरे यांचाही मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. प्राजक्त तनपुरे यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यामुळे महाराष्ट्र विकास आघाडी सरकारमध्ये मामा भाजे मंत्री म्हणून काम करणार आहेत.

आज महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. विशेष म्हणजे या मंत्रिमंडळामध्ये एकूण ३६ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहेत. जयंत पाटील यांचे भाजे प्राजक्त तनपुरे यांनी आज राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. प्राजक्त तनपुरे यांचे वडील प्रसाद तनपुरे हे २५ वर्ष आमदार तर ५ वर्ष खासदार होते. आजोबा सुध्दा आमदार होते. राजकीय पार्श्वभूमी असलेल्या प्राजक्त तनपुरेंना मंत्रिमंडळात संधी मिळाली आहे.

आजच्या या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये राष्ट्रवादीचे १४, शिवसेनेचे १२, तर काँग्रेसचे १० मंत्र्यांचा समावेश आहे. मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या सर्व मंत्र्यांची यादी पुढील प्रमाणे आहे.

विस्तारामध्ये राष्ट्रवादीला १४ (१० कॅबिनेट आणि ४ राज्यमंत्रिपदं), शिवसेनेला १२ (८ कॅबिनेट आणि ४ राज्यमंत्रिपदं), तर काँग्रेसला १० (८ कॅबिनेट आणि २ राज्यमंत्रिपदं) मिळाली आहेत. आतापर्यंत तिन्ही पक्षातील प्रत्येकी दोघांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस यांचे अनुक्रमे १६-१४-१२ अशी मंत्रिपदं आहेत.

राष्ट्रवादीचे मंत्री

अजित पवार (उपमुख्यमंत्री)  – बारामती (पुणे)
दिलीप वळसे पाटील – बेगाव (पुणे)
धनंजय मुंडे – परळी (बीड)
अनिल देशमुख  – काटोल (नागपूर)
हसन मुश्रीफ – कागल (कोल्हापूर)
राजेंद्र शिंगणे  – सिंदखेड राजा (बुलडाणा)
नवाब मलिक – अणूशक्तिनगर (मुंबई)
राजेश टोपे – उदगीर (लातूर)
जितेंद्र आव्हाड – मुंब्रा कळवा (ठाणे)
बाळासाहेब पाटील – कराड उत्तर (सातारा)
दत्तात्रय भरणे (राज्यमंत्री) – इंदापूर (पुणे)
आदिती तटकरे (राज्यमंत्री) – श्रीवर्धन (रायगड)
संजय बनसोडे (राज्यमंत्री) – उदगीर (लातूर)
प्राजक्त तनपुरे (राज्यमंत्री) – राहुरी (अहमदनगर)

आतापर्यंत जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

शिवसेनेचे मंत्री 

संजय राठोड – दिग्रस (यवतमाळ)
गुलाबराव पाटील – जळगाव ग्रामीण (जळगाव)
दादा भुसे – मालेगाव बाह्य (नाशिक)
संदीपान भुमरे – पैठण (औरंगाबाद)
अनिल परब – मुंबई (विधानपरिषद)
उदय सामंत – रत्नागिरी (रत्नागिरी)
आदित्य ठाकरे – वरळी (मुंबई)
शंकरराव गडाख (क्रांतिकारी पक्ष) – नेवासा (अहमदनगर)
अब्दुल सत्तार (राज्यमंत्री) – सिल्लोड (औरंगाबाद)
शंभूराज देसाई (राज्यमंत्री) – पाटण (सातारा)
बच्चू कडू (राज्यमंत्री) – (प्रहार जनशक्ती) – अचलपूर (अमरावती)
राजेंद्र येड्रावकर (राज्यमंत्री) – शिरोळ (कोल्हापूर)

आतापर्यंत सुभाष देसाई आणि एकनाथ शिंदे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

काँग्रेसचे मंत्री

अशोक चव्हाण – भोकर (नांदेड)
के सी पाडवी – अक्कलकुवा (नंदुरबार)
विजय वडेट्टीवार – ब्रह्मपुरी (चंद्रपूर)
अमित देशमुख– लातूर शहर (लातूर)
सुनिल केदार – सावनेर (नागपूर)
यशोमती ठाकूर – तिवसा (अमरावती)
वर्षा गायकवाड – धारावी (मुंबई)
अस्लम शेख – मालाड पश्चिम (मुंबई)
सतेज पाटील (राज्यमंत्री) – कोल्हापूर (विधानपरिषद)
डॉ. विश्वजीत कदम (राज्यमंत्री) – पलुस कडेगाव (सांगली)

आतापर्यंत बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

कोणाकडे कोणती खात

छगन भुजबळ ( ०७)

ग्रामविकास, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, अन्न व औषध प्रशासन, अन्न आणि नागरी पुरवठा, अल्पसंख्याक विकास आणि कल्याण

जयंत पाटील (०७)

वित्त आणि नियोजन, गृहनिर्माण, सार्वजनिक आरोग्य, सहकार व पणन, ग्राहक संरक्षण, कामगार, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास

एकनाथ शिंदे (10)
गृह, नगरविकास, वने, पर्यावरण, पाणी पुरवठा व स्वच्छता, मृदा व जलसंधारण, पर्यटन, सार्वजनिक बांधकाम, संसदीय कार्य, माजी सैनिक कल्याण

सुभाष देसाई (१२)
उद्योग आणि खनिकर्म, उच्च व तंत्रशिक्षण, क्रीडा व युवक कल्याण, कृषि, रोजगार हमी योजना, फलोत्पादन, परिवहन, मराठी भाषा, सांस्कृतिक कार्ये आणि राजशिष्टाचार, भूकंप पुनर्वसन, बंदरे आणि खारभूमी विकास.

बाळासाहेब थोरात (0)

महसूल, ऊर्जा व अपारंपरिक ऊर्जा, वैद्यकीय शिक्षण, शालेय शिक्षण, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय (पदुम).

नितीन राऊत (0)

सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), आदिवासी विकास, महिला व बाल विकास, वस्त्रोद्योग, मदत व पुनर्वसन, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments