Placeholder canvas
Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईकला आणि अभिनयाला धर्माचा चष्मा लावणं योग्य नाही – नवाब मलिक

कला आणि अभिनयाला धर्माचा चष्मा लावणं योग्य नाही – नवाब मलिक

मुंबई l देशात कलेला आणि अभिनयाला धर्माचा चष्मा लावणं योग्य नाही मात्र भाजपाला धर्माचा चष्मा लावल्याशिवाय जमत नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपावर टीका केली आहे.

शिवसेनेने अजान स्पर्धा आयोजित केली आहे. याला भाजपाने आक्षेप घेतला असून त्याला मलिक यांनी उत्तर दिलं आहे. मलिक म्हणाले, शिवसेनेने अजान स्पर्धा सुरू केली असून या स्पर्धेला भाजपाने आक्षेप घेतला आहे.

मात्र, सोलापूर व इतर जिल्ह्यात घेण्यात आलेल्या गीतापठण कार्यक्रमात मुस्लिम मुलींनी पहिला क्रमांक पटकावला होता. ही सत्य परिस्थिती आहे.

दिलीप कुमार, शाहरुख खान, सलमान खान यांनी सिनेमामध्ये अनेक भूमिका केल्या आहेत. हे करताना त्यांनी मंदिरांमधील अनेक सीनही केले आहेत, याचा अर्थ त्यांनी धर्मांतर केलं आहे असा होत नाही, असंही मलिक यांनी म्हटलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments