Placeholder canvas
Wednesday, May 1, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईवाईट नेता मिळणं ही महाराष्ट्राची चूक नाही ; अमृता फडणवीसांची उध्दव ठाकरेंवर...

वाईट नेता मिळणं ही महाराष्ट्राची चूक नाही ; अमृता फडणवीसांची उध्दव ठाकरेंवर टीका

Amruta-Fadnavis-And-Uddhav-Thackerayमुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस ह्या ट्विटरच्या माध्यमातून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर दररोज हल्लाबोल करत आहेत. यामुळे फडणवीस विरुध्द ठाकरे असा सामना चांगलाच रंगला आहे. अमृता फडणवीस यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा  साधला आहे. “चांगला नेता कायम न ठेवणे हा महाराष्ट्राचा दोष,” असे ट्विट अमृता फडणवीस यांनी केले आहे.

“वाईट नेता मिळणे हा महाराष्ट्राचा दोष नाही. मात्र चांगला नेता कायम न ठेवणे हा महाराष्ट्राचा दोष, जागो महाराष्ट्र !” असे ट्विट अमृता फडणवीस यांनी केले आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या सावरकरांवरील विधानावरुन ट्विटरवर टीका केली होती. ‘राहुल गांधी यांचं वक्तव्य निंदनीय आहे! वीर सावरकर आणि त्यांची महानता किंवा सत्कार्यांच्या जवळपासही राहुल गांधी पोहचत नाहीत. इतकंच नव्हे, तर त्यांनी स्वत:ला ‘गांधी’ समजण्याची चूकही करु नये! कोणीही गांधी आडनाव लावून ‘गांधी’होऊ शकत नाही!’ असं ट्वीट फडणवीसांनी केलं  होतं.

यापूर्वी अमृता फडणवीस यांनी सोशल मीडियावर थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. “ठाकरे आडनाव लावल्याने कुणी ठाकरे होत नाही. त्यासाठी तत्त्वनिष्ठ असावं लागतं”, असं अमृता फडणवीस म्हणाल्या होत्या.

या ट्विटनंतर शिवसेना महिला आघाडीने अमृता फडणवीसांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन केलं. इतकंच नाही तर अमृता फडणवीस हाय हाय अशी घोषणाबाजीही सेना महिला आघाडीने  दिली. यानंतरही शिवसेना महिला आघाडीच्या या आंदोलनाचा व्हिडीओ अमृता फडणवीस यांनी स्वत:च्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला होता. शायरीच्या माध्यमातून टोला लगावला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments