Placeholder canvas
Sunday, April 28, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईप्रफुल्ल पटेलांची ईडी कार्यालयात चौकशी सुरु

प्रफुल्ल पटेलांची ईडी कार्यालयात चौकशी सुरु

praful patel ED office
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रसचे नेते, माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल सक्तवसुली संचलनालय (ईडी) कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले आहेत. दाऊदचा सहकारी इक्बाल मिर्ची याच्यासोबतच्या आर्थिक व्यवहारप्रकरणी, प्रफुल्ल पटेल यांना ईडीने नोटीस दिली होती. चौकशीसाठी हजर राहण्याचा आदेश दिला होता.

काय आहे प्रकरण…

वरळीत ‘सीजे हाऊस’ या इमारतीची पुनर्बाधणी पटेल यांच्या कंपनीने केली होती. या इमारतीमध्ये दाऊदचा सहकारी इक्बाल मिर्ची याच्या पत्नीच्या नावे सदनिका आहे. मिर्ची याची पत्नी हजरा मिर्ची हिने पटेल यांच्या कंपनीशी व्यवहार केला होता. तसेच सदनिका खरेदीच्या करारावर प्रफुल्ल पटेल आणि हजरा यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. दाऊदच्या सहकाऱ्याच्या पत्नीशी पटेल यांनी आर्थिक व्यवहार केला असून, त्यातून पटेल यांना आर्थिक फायदा झाल्याचे अंमलबजावणी संचालनालयाचे म्हणणे आहे.

या व्यवहाराच्या संदर्भात चौकशी करण्यासाठी पटेल यांना अंमलबजावणी संचालनालयाने नोटीस बजावत शुक्रवारी मुंबई कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. हवाई वाहतूक मंत्री असताना झालेल्या काही आर्थिक व्यवहारांच्या संदर्भात अलीकडेच अंमलबजावणी संचालनालयाने पटेल यांची चौकशी केली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments